ओल्या मटारच्या दाण्यांपासून घरीच बनवा अशी गरमागरम भजी; एकदम आवडीने खाल PHOTOS
- Published by:News18 Marathi
Last Updated:
हिरव्या मटारच्या दाण्यांपासून अतिशय चविष्ट असे भजी बनवता येऊ शकतात.
सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. त्यात हिरव्या मटारच्या शेंगा सहज उपलब्ध आहेत. कांदा आणि बटाटा भजी किंवा पकोडे आपण नेहमीच खातो मात्र मटारची भजी कधी खाल्ली आहेत का? तर हिरव्या मटारच्या दाण्यांपासून अतिशय चविष्ट असे भजी बनवता येऊ शकतात. याची रेसिपी वर्धा येथील गृहिणी कुमुद गायकवाड यांनी सांगितली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ओले हिरवे मटार, चणाडाळीचं पीठ, तांदळाचे पीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट, हळद, मीठ, जिरेपूड, कोथिंबीर, तीळ, ओवा, त्यात तुम्ही धणेपूड आणि आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता हे देखील अॅड करू शकता. पाण्याने हे मिश्रण एकत्र घट्ट तयार करून गरमागरम भजी तळून घ्यावीत. तुम्ही देखील थंडीच्या वातावरणात ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा.