शनिवारचा दिवस; दुपारची वेळ अन् हातात 1 कोटी 30 लाखाची 'उलटी' घेऊन चाललेले दोघं, पुण्यात पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Last Updated:

त्यांच्याकडून सुमारे १ कोटी ३० लाख रुपये किमतीचा १ किलो ३८० ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी (AI Image)
व्हेल माशाच्या उलटीची तस्करी (AI Image)
पुणे : पुण्यातील आळंदी परिसरात गुन्हे शाखेच्या मालमत्ता विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या पथकाने व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून सुमारे १ कोटी ३० लाख रुपये किमतीचा १ किलो ३८० ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई शनिवारी (२७ डिसेंबर) दुपारी आळंदी-मरकळ रस्त्यावरील घोलप वस्तीत करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम पद्माकर अडागळे (वय २७) आणि अक्षय ऊर्फ दाद्या वरनकर (वय ३०) या दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अक्षयने हा मौल्यवान पदार्थ शुभम याला विक्रीसाठी दिला होता. गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार हर्षद कदम यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
advertisement
व्हेल माशाची उलटी इतकी महाग का असते?
अंबरग्रीस म्हणजेच व्हेल माशाची उलटी हा पदार्थ व्हेलच्या शरीरात तयार होतो. हा मेणासारखा पदार्थ समुद्रात तरंगत असताना काळानुसार कडक होतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याला 'तरंगतं सोनं' म्हटलं जातं. महागड्या परफ्युम्सचा सुगंध बराच काळ टिकवून ठेवण्यासाठी या पदार्थाचा 'फिक्सेटिव्ह' म्हणून वापर केला जातो. जगातील अनेक नामांकित ब्रँड्समध्ये याचा वापर होतो. काही देशांमध्ये पारंपारिक औषधे आणि सुगंधी धूप तयार करण्यासाठी अंबरग्रीसचा वापर केला जातो. भारतात वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत व्हेल मासा हा संरक्षित प्राणी आहे. त्यामुळे अंबरग्रीसची विक्री, साठा करणे किंवा तस्करी करणे हा गंभीर दखलपात्र गुन्हा असून यामध्ये १० वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
शनिवारचा दिवस; दुपारची वेळ अन् हातात 1 कोटी 30 लाखाची 'उलटी' घेऊन चाललेले दोघं, पुण्यात पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement