Nanded: गावातून उचललं, स्टेशनमध्ये बेदम मारलं अन् पोलीस उपनिरीक्षकाने चेहऱ्यावर केली लघुशंका, तरुणांच्या आरोपाने खळबळ
- Reported by:Mujeeb Shaikh
- Published by:Sachin S
Last Updated:
नांदेड जिल्ह्यातील हदगाव पोलीस स्टेशनमध्ये 14 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. पोलीस उपनिरीक्षक नंद यांनी पोलीस स्टेशनमध्ये तरुणांच्या तोंडावर लघुशंका केल्याचा आरोप गावातील ५ तरुणांनी केला आहे.
नांदेड : छत्रपती संभाजीनगरमध्ये १४ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस कॅमेऱ्यात कैद झाल्याची घटना ताजी असताना आता नांदेडमध्ये खाकी वर्दीत असलेल्या पोलिसाचा भयावह चेहरा समोर आला आहे. गावात झालेल्या किरकोळ वादातून ताब्यात घेतलेल्या तरुणाला सोडण्यासाठी पोलिसाने १० हजार रुपये मागितले. पैसे न दिल्यामुळे पोलीस उपनिरीक्षकाने तरुणाच्या तोंडावर लघुशंका केल्याचा संतापजनक आरोप केला आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील हदगाव पोलीस स्टेशनमध्ये 14 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. पोलीस उपनिरीक्षक नंद यांनी पोलीस स्टेशनमध्ये तरुणांच्या तोंडावर लघुशंका केल्याचा आरोप गावातील ५ तरुणांनी केला आहे. अक्षय कांबळे असं आरोप करण्याच्या तरुणाचं नाव आहे. या घटनेची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी भीम टायगर सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला आणि तक्रार दिली.
advertisement
काय आहे प्रकरण?
14 फेब्रुवारी रोजी हदगाव तालुक्यातील लहरी येथे नामविस्तार दिनाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमांमध्ये किरकोळ वाद होऊन हादगाव पोलीस स्टेशन येथे एकमेकावर परस्पर गुन्हे दाखल झाले होते. मात्र 15 फेब्रुवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक नंद हे गावामध्ये गाडी घेऊन आले. आरोप करणाऱ्या अक्षय याच्या घरी आले. नंद यांनी अक्षयला गाडी बसण्यासं सांगितलं आणि शिवीगाळ केली. त्यानंतर अक्षय यांच्यासह इतर ४ जणांच्या घरीही गेले होते. एकूण ५ जणांना गाडीत बसवू नंद हे पोलीस स्टेशनला पोहोचले. अक्षय आणि त्याच्या साथीदारांनी आम्हाला पोलीस स्टेशनला का घेऊन आले अशी विचारणा केली. पण, कोणतंही उत्तर दिलं नाही. पोलीस स्टेशनला नेल्यानंतर नंद यांनी ५ ही तरुणांना बेदम मारहाण केली. वेगवेगवेळ्या रुममध्ये नेऊन मारहाण केली, असा आरोप अक्षयने केला.
advertisement
तसंच, उपनिरीक्षक नंद हे ड्युटीवर गेले होते, तिथून आल्यानंतर पुन्हा त्यांनी मारहाण केली. दिघे नावाचे अधिकारी पोलीस स्टेशनला आले, त्यांनी आम्हाला विचारलं पण नंद यांच्या कर्मचाऱ्याने काही न सांगण्याची ताकीद दिली. दिघे साहेब निघून गेल्यानंतर पुन्हा उपनिरीक्षक नंद यांनी आम्हाला मारहाण केली. त्यानंतर त्यांनी प्रत्येकाकडून १० हजार रुपये मागितले. जर १० हजार रुपये दिले नाही तर ३ महिने जामीन होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर एका रूममध्ये नेऊन पुन्हा मारहाण केली आणि तोंडावर लघुशंका केली, असा आरोप अक्षय कांबळे तरुणाने केला आहे.
advertisement
गावकरी आणि दलित संघटनेनं पोलीस स्टेशनला घातला घेराव
दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर भिम टायगर सेना आणि गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला. पोलीस उपनिरीक्षक नंद यांनी आरोप करणाऱ्या अक्षय कांबळे याच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. बेदम मारहाण केली. पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले तिथे दिसणार नाही, अशा ठिकाणी जाऊन मारहाण केली होती. एवढंच नाहीतर नंद यांनी मारहाण केल्यानंतर ५ ही तरुणांना रुग्णालयात घेऊन गेले आणि तिथे डॉक्टरांना काही सांगायचं नाही, असं म्हणत धमकी दिली. आम्ही या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे, पोलीस उपनिरीक्षक नंद यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी दादासाहेब शेळके यांनी केली.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 8:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nanded: गावातून उचललं, स्टेशनमध्ये बेदम मारलं अन् पोलीस उपनिरीक्षकाने चेहऱ्यावर केली लघुशंका, तरुणांच्या आरोपाने खळबळ









