केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या गाडीला भीषण अपघात, बॉडीगार्डसह तिघे गंभीर जखमी, कारचा चक्काचूर

Last Updated:
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नजीक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
1/7
समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता थेट केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नजीक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

advertisement
2/7
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे रविवारी नागपूर दौऱ्यावर होते. त्यांना नागपूर विमानतळावर सुखरूप पोहोचविल्यानंतर, त्यांची कार (ज्यामध्ये त्यांचे सहकारी आणि बॉडीगार्ड होते) परत मेहकरकडे निघाली होती.

3/7
रात्री उशिरा ही कार समृद्धी महामार्गावरून जात असताना मालेगाव परिसरात कारवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला.

4/7
या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, कारमधील तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. यामध्ये मंत्र्यांचे बॉडीगार्ड, त्यांचे सहकारी आणि कारचालक यांचा समावेश आहे. अपघात घडताच स्थानिक प्रशासन आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने बाहेर काढले.

5/7
सध्या त्यांच्यावर वाशिममधील एका नामांकित खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

6/7
हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडला होता. मात्र, घटनेचं गांभीर्य आणि रात्रीची वेळ पाहता, मंत्री प्रतापराव जाधव यांना या दुर्घटनेची माहिती रविवारी दुपारी देण्यात आली.

7/7
आपल्या सहकाऱ्यांच्या अपघाताची बातमी समजताच मंत्र्यांनी तातडीने जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली असून, त्यांना योग्य ते उपचार मिळतील याची खात्री केली आहे.

Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement