Pune: एकेकाळी शरद पवारांच्या खास जवळचे सहकारी, आज फोटो पाहून ओळखताही येईना!
- Published by:Sachin S
Last Updated:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज दोन गटात वाटला गेला आहे. शरद पवार आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. शरद पवारांसोबत असलेले अनेक नेते आणि विश्वासू सहकारी हे अजित पवारांच्या गटात सामील झाले. त्यापैकी एक नाव होतं
राजकारणामध्ये कधीच काही स्थिर राहत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही वर्षांमध्ये इतके बदल झाले आहे की, कोणता नेता हा कुणासोबत होता आणि उद्या कुणासोबत असेल, हे सांगणं आता कठीण झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज दोन गटात वाटला गेला आहे. शरद पवार आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. शरद पवारांसोबत असलेले अनेक नेते आणि विश्वासू सहकारी हे अजित पवारांच्या गटात सामील झाले. त्यापैकी एक नाव होतं दिलीप वळसे पाटील.
advertisement
दिलीप वळसे पाटील हे संयमी आणि प्रशासकीय कौशल्यासाठी ओळखली जाणारे मंत्री आणि नेते म्हणून ओळखले जातात. शरद पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी राष्ट्रवादीत अनेक चढउतार पाहिले. वळसे पाटील यांनी सुरुवातीला शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिलं. त्यांच्या हाताखाली राजकारणातले डावपेच शिकले. पुढे पवारांसोबत असताना त्यांनी सरकारमध्ये अनेक मंत्रिपदं भुषवली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







