IPS बिरदेव डोणे यांच्या कुटुंबाचा पहिलाच विमान प्रवास, डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

Last Updated:
IPS Birdev Done: कुटुंबाच्या पहिल्या विमान प्रवासानंतर आयपीएस अधिकारी बिरदेव डोणे काहीसे भावुक झाले.
1/5
परिस्थिती अत्यंत हालाखीची, कष्ट करेल तेव्हाच घरात चूल पेटेल, अशी हालत असतानाही कोल्हापूरच्या यमगे गावातील मेंढपाळाचा लेक बिरदेव डोणे देशात ५५१ वी रँक मिळवून भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. कुटुंबाने कधीही रेल्वे प्रवासही केलेला नसताना बिरदेव यांच्या कामगिरीने त्यांना विमान प्रवास करण्याची संधी मिळाली.

advertisement
2/5
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावातील बिरदेव डोणे यांनी 2024 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात आयपीएस अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.

3/5
प्रशिक्षण काळात आयपीएस अधिकाऱ्याच्या कुटुंबाला पोलीस अकादमीच्या मुख्यालयाला भेट देण्याची संधी असते. बिरदेव यांच्या कुटुंबाने गेल्या दोन दिवसांपूर्वी अकादमीला भेट दिली. धनगरी वेषातच बिरदेव यांचे कुटुंब हैदराबादला आले होते.

4/5
कोणताही बडेजाव नाही, अगदी साध्या पेहरावात बिरदेव यांच्या कुटुंबाने पोलीस अकादमीच्या मुख्यालयाला भेट दिली. तेथील परिसर न्याहाळला. लेकाच्या कामगिरीने एवढ्या मोठ्या शहरात आलो, अधिकाऱ्यांना भेटलो, विमान प्रवास केला याबद्दलचा आनंद त्यांच्या डोळ्यांत दिसत होता.

5/5
कुटुंबाच्या पहिल्या विमान प्रवासानंतर बिरदेव डोणे काहीसे भावूक झाले. ज्या वेळेपासून मी फक्त विमान पाहण्याचे स्वप्न पाहत होतो,  ज्या दिवशी मी माझ्या कुटुंबाला त्या पायऱ्या चढू शकेन तोपर्यंत हा क्षण शब्दांच्या पलीकडे आहे. फक्त कृतज्ञता... अशी भावुक पोस्ट बिरदेव डोणे यांनी समाज माध्यमांवर केली आहे.

Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement