मुंबईत निवडणूक आयोगाच्या पथकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी, खतरनाक Video
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
BMC: निवडणूक आयोगाचा स्थिर सर्वेक्षण पथकावर हल्ला प्रकरणी विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
संकेत वरक, प्रतिनिधी, मुंबई : बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची तयारीची लगबग सुरू असताना निवडणूक आयोगाच्या पथकावर हल्ला झाला आहे. निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाला चार जणांकडून लक्ष्य करण्यात आले. यात एक जण गंभीर जखमी झाला.
निवडणूक आयोगाचा स्थिर सर्वेक्षण पथकावर हल्ला प्रकरणी विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. काल मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास विलेपार्ले येथील मिलन सबवे जवळ आयोगाच्या पथकावर हल्ला झाला.
एका कारमध्ये चार जण बसून आले होते. निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाच्या व्हिडिओ ग्राफरचे काम सुरू असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढवला. यात व्हिडीओग्राफर गंभीर झाला. नाकाबंदी लावून गाड्यांची तपासणी सुरू असताना हल्लेखोरांनी लक्ष्य केले.
advertisement
याच प्रकरणी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये हल्ला करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोरांचा नेमका उद्देश काय होता? त्यांना हा हल्ला कुणी करायला सांगितला का? याची तपासणी मुंबई पोलीस करीत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 28, 2025 9:27 PM IST










