BMC Election 2026 : मुंबईत भाजपचा पहिला उमेदवार ठरला, यादी जाहीर होण्याआधीच वाजत गाजत अर्ज भरणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुंबईत भाजपचा पहिला उमेदवार ठरला आहे. विशेष म्हणजे पहिल्या यादीची घोषणा होण्याआधीच भापजच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे.त्यामुळे भाजपचा हा पहिला उमेदवार कोण आहेत. हे जाणून घेऊयात.
BMC Election 2026: विजय वंजारा, प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच जागावाटप जवळपास ठरलं आहे.फक्त भाजप आणि एकनाथ शिंदे यांची यादी जाहीर होणे बाकी आहे.या यादीची प्रतिक्षा असतानाच आता मुंबईत भाजपचा पहिला उमेदवार ठरला आहे. विशेष म्हणजे पहिल्या यादीची घोषणा होण्याआधीच भापजच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे.त्यामुळे भाजपचा हा पहिला उमेदवार कोण आहेत. हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.
भाजपच्या पहिल्या उमेदवार या तेजस्वी घोसाळकर ठरल्या आहे. नुकताच त्यांनी ठाकरे गटातून निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर त्याला दहिसरमधून तिकीट दिलं जाईल अशी चर्चा होती. आणि तसेच आज घडले आहे. विशेष म्हणजे भाजपकडून अद्याप मुंबईतील पहिली उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही आहे. पण तेजस्वी घोसाळकर यांनी दहिसर-वॉर्ड क्रमांक 2 मधून उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याची सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टवरून मुंबईत भाजपचा पहिला उमेदवार ठरल्याची चर्चा आहे. पण भाजपकडून सध्या तरी तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाची घोषणा झाली नाही आहे.
advertisement
दहिसर- वॉर्ड क्रमांक २ मधून मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यानिमित्त आयोजित भव्य रॅलीमध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.
दहिसरच्या न्याय आणि प्रगतीसाठी आपले आशीर्वाद आणि साथ मोलाची आहे. तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा ही नम्र… pic.twitter.com/JkZGbufISJ
— Tejasvee Abhishek Ghosalkar (@tejasvee27) December 28, 2025
advertisement
सोशल मीडिया पोस्ट
दहिसर- वॉर्ड क्रमांक 2 मधून मी उद्या सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यानिमित्त गावदेवी मंदिर ते रुस्तम जी स्कूल पर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार आहे.त्यामुळे रॅलीमध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.दहिसरच्या न्याय आणि प्रगतीसाठी आपले आशीर्वाद आणि साथ मोलाची आहे. तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा ही नम्र विनंती,अशा आशयाची पोस्ट तेजस्वी घोसाळकर यांनी एक्सवर केली आहे. यासह भाजपाकडून आणखी तीन उमेदवारांचे नाव निश्चित झाले आहेत.
advertisement
दरम्यान मुंबईतील उमेदवारांची अधिकृतपणे यादी जाहीर करण्यात आली नाही आहे. पण पक्षाकडून उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.त्यामुळे अनेक उमेदवारांनी स्वत:च्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन उमेदवारांनी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.
भाजपमध्ये प्रवेश करताना काय म्हणाल्या?
तेजस्वी घोसाळकर या ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत.त्यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश केला होता.त्यावेळी तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले की, हा निर्णय कठीण आहे. मनात खूप गोष्टी आहेत, खूप काही बोलायचं आहे. ज्यांनी ओळख दिली, तो पक्ष सोडताना, परिवाला सोडताना खूप दु:ख होत आहे. प्रभागातील विकास कामांसाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात माझ्या प्रभागात विकास कामे, अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा संथगतीने सुरू असलेल्या सीबीआय तपासाला वेग येईल आणि आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा असल्याचे तेजस्वी घोसाळकरांनी सांगितले.
मुंबई महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर घोसाळकर यांचा प्रभाग आरक्षित झाला होता. त्यानंतर त्यांनी प्रभाग आरक्षित झाल्याने नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आपण पक्षाचे काम जोमाने सुरू ठेवणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांमध्ये तेजस्वी घोसाळकरांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली होती. अखेर आज सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 28, 2025 9:19 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Election 2026 : मुंबईत भाजपचा पहिला उमेदवार ठरला, यादी जाहीर होण्याआधीच वाजत गाजत अर्ज भरणार









