Ashes सुरू असतानाच आली वाईट बातमी, इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटूचं निधन
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
इंग्लंडची क्रिकेट टीम सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर ऍशेस सीरिजसाठी गेली आहे. 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजच्या पहिल्या 3 टेस्ट ऑस्ट्रेलियाने तर चौथी टेस्ट इंग्लंडने जिंकली आहे.
मुंबई : इंग्लंडची क्रिकेट टीम सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर ऍशेस सीरिजसाठी गेली आहे. 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजच्या पहिल्या 3 टेस्ट ऑस्ट्रेलियाने तर चौथी टेस्ट इंग्लंडने जिंकली आहे. इंग्लंडची टीम ऑस्ट्रेलियामध्ये असतानाच त्यांच्या दिग्गज क्रिकेटपटूचं निधन झालं आहे. इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे माजी सीईओ ह्यू मॉरिस यांचं निधन झालं आहे, ते 62 वर्षांचे होते. वेल्स काउंटी संघ ग्लॅमॉर्गनने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की त्यांचे माजी कर्णधार मॉरिस यांचे अनेक वर्षे आतड्यांसंबंधी कर्करोगाशी झुंज देऊन निधन झाले. ओपनिंग बॅटर म्हणून मॉरिसनी इंग्लंडसाठी तीन सामने खेळले आणि 1997 मध्ये ग्लॅमॉर्गनला काउंटी चॅम्पियन बनण्यास मदत केली. त्यानंतर एका वर्षानंतर ते क्रिकेटमधून निवृत्त झाले.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रम
मॉरिस यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 19,785 रन केल्या, यात त्यांची सरासरी 40.29 इतकी होती. त्यानंतर त्यांनी 16 वर्ष इंग्लंड क्रिकेट बोर्डामध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केलं, ज्यात सीईओ पदाचाही समावेश होता. मॉरिस 2013 साली सीईओ म्हणू ग्लॅमॉर्गनमध्ये परतले आणि टीमला आर्थिक अडचणींवर मात करण्यास मदत केली. सध्याचे ग्लॅमॉर्गन सीईओ डॅन चेरी म्हणाले की मॉरिस एक उत्तम खेळाडू, उत्कृष्ट प्रशासक आणि प्रचंड प्रतिष्ठा आणि सचोटी असलेला एक अद्भुत माणूस होता.
advertisement
'ह्यू आपल्यासाठी एक अद्भुत वारसा सोडून गेले आहे, विशेषतः सोफिया गार्डन्स येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियमच्या रूपात, हे मैदान त्यांनी उमेदीच्या काळात ग्लॅमॉर्गनसाठी खेळलेल्या मैदानापेक्षा खूप वेगळे आहे,', असं चेरी म्हणाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 28, 2025 9:45 PM IST










