फक्त 3 दिवस बाकी! जानेवारी सुरू होताच या राशींवर येणार मोठी संकटं, दु:खाचा डोंगर कोसळणार

Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्ष 2026 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. नव्या वर्षाची सुरुवात होताच जानेवारी महिना सर्वांसाठी उत्सुकतेचा असतो.
1/6
astrology news
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्ष 2026 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. नव्या वर्षाची सुरुवात होताच जानेवारी महिना सर्वांसाठी उत्सुकतेचा असतो. या महिन्यात ग्रहांच्या हालचालींमुळे काही राशींना अनुकूल तर काही राशींना आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. विशेषतः जानेवारी महिन्यात ग्रहस्थितीमुळे चार राशींच्या आयुष्यात अडथळे, मानसिक ताण आणि आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या राशींच्या व्यक्तींनी अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे.
advertisement
2/6
वृषभ रास
वृषभ रास - वृषभ राशीच्या लोकांसाठी जानेवारी 2026 हा महिना थोडासा कठीण ठरू शकतो. महिन्याच्या सुरुवातीपासूनच कामाच्या ठिकाणी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संवाद करताना संयम राखणे अत्यंत आवश्यक ठरेल. आर्थिक बाबतीत फार मोठा लाभ दिसून येत नसला तरी खर्च वाढण्याची शक्यता आहे. यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. मात्र, अशा परिस्थितीत कुटुंबीयांचा पाठिंबा तुमच्यासाठी आधारस्तंभ ठरेल. निर्णय घेताना घाई टाळा आणि प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करा.
advertisement
3/6
astrology
कर्क रास - कर्क राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना आळशीपणा आणि उदासीनतेचा ठरू शकतो. या काळात काम करण्याची इच्छाशक्ती कमी राहील. नवीन उपक्रम सुरू करण्यापेक्षा जुन्या कामांकडे लक्ष देणे अधिक योग्य ठरेल. आर्थिक बाबतीत खर्चाचा ताण जाणवू शकतो, तसेच उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल राखणे कठीण जाईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामात समाधान मिळणार नाही. त्यामुळे मानसिक थकवा जाणवण्याची शक्यता आहे. अशा वेळी योग, ध्यान आणि सकारात्मक विचारसरणी अंगीकारल्यास मानसिक शांती लाभू शकते.
advertisement
4/6
astrology
तूळ रास -  तूळ राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना जबाबदाऱ्या आणि मानसिक तणाव घेऊन येऊ शकतो. कुटुंब, नोकरी आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल साधताना अडचणी येऊ शकतात. मात्र, महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थितीत हळूहळू सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. नातेसंबंधांमध्ये गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद ठेवा. आरोग्य सामान्य राहील, पण तणाव वाढू देऊ नका, अन्यथा त्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो.
advertisement
5/6
मकर रास
मकर रास - मकर राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना संयमाची परीक्षा पाहणारा ठरू शकतो. या काळात खर्च अचानक वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्यामुळे थकवा जाणवेल. अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत नसल्याने चिडचिड होऊ शकते. मात्र, अशा परिस्थितीत शांत राहणे आणि धीर न सोडणे महत्त्वाचे ठरेल. कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा जोखमीचे निर्णय या महिन्यात टाळावेत. नियोजनबद्ध पद्धतीने पुढे गेल्यास अडचणींवर मात करता येईल.
advertisement
6/6
astrology
<strong>(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)</strong>
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement