विदर्भातील झणझणीत कोष्टी डाळ-कांदा घरगुती पद्धतीनं कशी बनवाल? रेसीपी पाहाच एकदा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
विदर्भ कोष्टी डाळ-कांदा अनेक खवय्यांना भूरळ घालतो. त्यामुळे शाकाहारी जेवणात या पदार्थाला मोठी पसंती असते.
विदर्भाची खाद्यसंस्कृती अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे. विदर्भातील मराठा पाटोडी, सावजी, यासह डाळ-कांदा देखील प्रसिद्ध आहे. विदर्भ कोष्टी डाळ-कांदा अनेक खवय्यांना भूरळ घालतो. त्यामुळे शाकाहारी जेवणात या पदार्थाला मोठी पसंती असते. हाच विदर्भ कोष्टी चमचमीत डाळ-कांदा घरगुती पद्धतीनं कसा बनवायचा हे वर्धा येथील गृहिणी कीर्ती अलोणे यांनी सांगितली आहे.
advertisement
विदर्भ कोष्टी डाळ-कांदा रेसिपी ही घरगुती साहित्यातूनच तयार करता येते. त्यासाठी प्रामुख्याने 1/3 वाटी भिजवलेली चना डाळ, अंदाजे अर्धा किलो कांदे, आलं लसूण पेस्ट घ्यावी लागेल. तसेच चवीनुसार मीठ, हळद, तिखट, थोडा गरम मसाला, धने पावडर, जीरे पावडर, तमालपत्र, तेल 1 वाटी, धने आणि खोबरे पेस्ट, कोथिंबीर आदी पदार्थही आवश्यक आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अंदाजे 2 मिनीटांनी गरम पाणी अॅड करा. आता भिजवून ठेवलेली डाळ अॅड करून पंधरा मिनिटे शिजण्यासाठी ठेवावे. डाळ चांगली शिजल्यानंतर मीठ अॅड करा. पुन्हा थोडा वेळ शिजल्यानंतर आता भाजीला चांगली तरी आलेली दिसेल. भाजीवर कोथिंबीर घालून आता विदर्भ कोष्टी स्टाईल झणझणीत डाळ- कंदा खाण्यासाठी तयार आहे. भाजीची तर्री कांदा आणि मसाले चांगले शिजण्यावर आहे.
advertisement