नाश्ता होईल भारीच, घरीच बनवा विदर्भातील प्रसिद्ध सांबार वडी, रेसिपी अगदी सोपी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
सांबार वडी विदर्भातील अतिशय प्रसिद्ध आणि पारंपारिक पदार्थ आहे. कोथिंबीर म्हणजेच विदर्भात त्याला सांबार म्हणतात. तोच सांबार आणि इतर साहित्य वापरून बनवलेली ही सांबार वडी विदर्भातील लोकांच्या अतिशय आवडीची आहे.
advertisement
advertisement
advertisement
सांबार वडी बनवण्यासाठी कृती : सर्वात आधी आपल्याला सांबार वडीला आवरण बनवण्यासाठी मैदा भिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मैदा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा. त्यात ओवा, जिरे, मीठ, सोडा आणि गरम केलेले तेल टाकून घ्यायचे. त्यानंतर ते मिश्रण हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून घट्टसर मळून घ्यायचं. त्यानंतर ते झाकण ठेऊन बाजूला ठेवायचं.
advertisement
मैदा एकजीव होऊन मऊ होईपर्यंत आपल्याला सांबार वडीचे सारण करून घ्यायचे आहे. त्यासाठी सर्वात आधी भांड्यात थोडे तेल टाकून ते गरम होऊ द्यायचे. त्यानंतर त्यात जिरे आणि ओवा टाकायचा. त्यानंतर हळद आणि लाल तिखट टाकायचे. लगेच त्यात शेंगदाण्याचे कूट आणि हिरवी मिरची टाकायची. ते थोडं परतवून घ्यायचं आणि त्यात कोथिंबीर टाकायचं. ते व्यवस्थित मिक्स झालं की त्यात मीठ आणि साखर टाकायची. त्यांनतर 5 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचं.
advertisement
advertisement
त्यानंतर चारही बाजू फोल्ड करून घ्यायचं. त्यानंतर सारण भरलेल्या पोळीचा रोल करायचा. रोल झाल्यानंतर ती थोडी हाताने प्रेस करायची. तुमची सांबार वडी तयार होईल. त्यानंतर तळण्यासाठी तेल मध्यम आचेवर गरम करून घ्यायचे आणि त्यात सांबार वडी तळून घ्यायची. गॅस मध्यमच ठेवायचा. सोनेरी रंग येईपर्यंत सांबार वडी तळून घ्यायची. तळून झाल्यानंतर तुम्ही ती वडी मसाला ताक किंवा रस्स्यासोबत खाऊ शकता. अतिशय टेस्टी लागते.