Nalasopara News : बापरे! केस न मागे घेतल्याचा राग; ब्युटी पार्लमध्ये महिलेला जोरदार मारहाण; पतीवर गुन्हा दाखल
Last Updated:
Nalasopara Shocking News : ब्युटी पार्लरमध्ये घुसून एका महिलेवर अमानुष मारहाण करण्यात आली. केस न मागे घेतल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचा आरोप असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपारा : नायगाव पूर्व परिसरातील एका ब्युटी पार्लरमध्ये घुसून एका महिलेवर अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या पतीसह 6 ते 7 अनोळखी महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्युटी पार्लरमध्ये पतीचा हायव्होल्टेज ड्रामा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने आपल्या पतीविरोधात वसई न्यायालयात घटस्फोट आणि पोटगीसाठी दावा दाखल केला आहे. हा खटला मागे घ्यावा यासाठी पतीकडून तसेच त्याच्या ओळखीच्या व्यक्तींकडून तिच्यावर सातत्याने दबाव टाकण्यात येत होता. मात्र महिलेने न्यायालयीन प्रक्रिया मागे घेण्यास ठाम नकार दिला.
या नकाराचा राग मनात धरून आरोपी पतीने 4 ते 5 महिलांना पीडितेच्या ब्युटी पार्लरमध्ये पाठवले, असा आरोप करण्यात आला आहे. या महिलांनी थेट पार्लरमध्ये घुसून पीडित महिलेला ठोसे-बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीमुळे पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
घटनेनंतर नायगाव पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या महिलांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 10:58 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Nalasopara News : बापरे! केस न मागे घेतल्याचा राग; ब्युटी पार्लमध्ये महिलेला जोरदार मारहाण; पतीवर गुन्हा दाखल









