Idli : वजन कमी करताना इडली खाल्ली तर चालते का? डाएटमध्ये समावेश करण्यापूर्वी 'हे' नक्की वाचा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जर तुम्हीही फिटनेस प्रवासात असाल आणि इडलीचा पर्याय सकाळच्या नाष्टासाठी विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. चला जाणून घेऊया
सकाळची घाई असो किंवा रविवारचा निवांत नाश्ता, आपल्या ताटात वाफाळलेली पांढरीशुभ्र इडली आणि चटणी दिसली की भूक आपोआप वाढू लागते. दक्षिण भारतीय पदार्थ असला तरी इडली आता घराघरात पोहोचली आहे. पचायला हलकी आणि चवीला चविष्ट असल्याने लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच इडलीवर ताव मारतात. पण जेव्हा विषय 'वजन कमी करण्याचा' (Weight Loss) येतो, तेव्हा आपल्या मनात शंका येते "इडली खाल्ल्याने वजन वाढेल का?" किंवा "डाएटमध्ये इडली खाणे कितपत योग्य आहे?"
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
इडली आरोग्यदायी असली तरी, ती कशासोबत आणि किती खाताय हे महत्त्वाचे आहे.तांदळाचे प्रमाण: पारंपरिक इडलीमध्ये तांदळाचे प्रमाण जास्त असते, जे 'सिंपल कार्बोहायड्रेट्स' आहेत. जर तुम्ही एका वेळी 4-5 इडल्या खात असाल, तर साखरेची पातळी वाढू शकते.चटणी आणि सांबार: इडलीसोबत मिळणाऱ्या खोबऱ्याच्या चटणीत फॅट्स जास्त असतात. तसेच सांबारमध्ये जर जास्त साखर किंवा गूळ असेल, तर ते डाएटसाठी योग्य नाही.
advertisement
वेट लॉससाठी इडली खाताना 'या' ५ टिप्स फॉलो करा:पीठ तयार करताना तांदळाचे प्रमाण कमी करून डाळीचे प्रमाण वाढवा.इडली अधिक पौष्टिक करण्यासाठी पीठात किसलेलं गाजर, बीट किंवा बारीक चिरलेला पालक घाला. यामुळे फायबर वाढते.आता 'ओट्स इडली', 'रवा इडली' किंवा 'नाचणी इडली' हे प्रकार लोकप्रिय होत आहेत. तांदळाऐवजी बाजरी किंवा नाचणी वापरल्यास वजन वेगाने कमी होण्यास मदत होते.इडली कमी खा आणि भाज्यांनी भरलेले सांबार जास्त प्या. यामुळे पोट भरेल आणि कॅलरीज कमी मिळतील.कधीतरी शेंगदाणा चटणी किंवा पुदिना-कोथिंबीर चटणीसोबत इडली खाणे अधिक फायदेशीर ठरते.
advertisement
advertisement









