advertisement

Child Privacy Online : मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणं पडू शकतं महाग! 'या' गोष्टी तुम्हाला माहित हव्याच..

Last Updated:
Risks of posting child photos online : हल्ली पालक मुलांचे प्रत्येक सणाला किंवा कोणत्याही कार्यक्रमाला काढलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रेमानं शेअर करतात. उद्देश फक्त आनंद पसरवण्याचाच असतो आणि मुलांचं कौतुक असतं. पण आपलं हे प्रेम आणि कौतुक मुलांसाठी प्रत्येकवेळी चांगलंच असेल असं नाही. काहीवेळा मुलांचे असे फोटो शेअर करणं घातक ठरू शकतं.
1/9
मुलांचे फोटो शेअर केल्याने अनेक प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता असते. या फोटोंच्या माध्य्मातून आपण नकळत आपल्या लहान मुलांच्या आयुष्याबद्दल सर्व माहिती लोकांसाठी खुली करत असतो. काही लोक याचा दुरुपयोगही करू शकतात.

2/9
आपण कितीही प्रायव्हसी सेटिंग्स केल्या तर कोणत्याही सोशल मीडियावर शेअर केले फोटो हॅकर्सना डाउनलोड करता येऊ शकतात. त्यामुळे बऱ्याच असे लोक मुलांचे फोटो चोरतात आणि ते स्वतःचे म्हणून सोशल मीडियावर पोस्ट करतात.

3/9
वाईट प्रवृत्तीचे लोक या फोटोंचा वापर खोट्या ओळखी तयार करण्यासाठी, बनावट आयडी चालवण्यासाठी किंवा डार्क वेबसारख्या धोकादायक प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यासाठी करू शकतात. जेव्हा मुलांच्या प्रत्येक अ‍ॅक्टिव्हिटीचे फोटो ऑनलाइन पोस्ट केले जातात तेव्हा आपण नकळतपणे 'डिजिटल फूटप्रिंट' तयार करत असतो.

4/9
जेव्हा मूल मोठे होईल तेव्हा कदाचित त्यांना हे बालपणीचे फोटो संपूर्ण जगाने पाहिलेले आवडणार नाहीत. यामुळे भविष्यात मुलांच्या सामाजिक प्रतिष्ठेवर देखील परिणाम होण्याची शक्यता असते. कारण इंटरनेटवरून कधीही काहीही पूर्णपणे हटवलं जाऊ शकत नाही.

5/9
मुलांचे फोटो शेअर करताना आपण काही छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. जसे की, शाळेचा गणवेश, जवळचे उद्यान किंवा चेक-इन लोकेशन.. यामुळे गुन्हेगारांना तुमचे मूल कुठे आहे, हे सहज कळू शकते. असे लोकेशन टॅग असलेला फोटो मुलांच्या सुरक्षिततेवर गदा अनु शकतो आणि एखाद्या बेसावध क्षणी मुलांसोबत अप्रिय घटना घडण्याची शक्यता असते.

6/9
हल्ली आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे काही फायदे पण त्यापेक्षा जास्त नुकसान शिवण्याची शक्यता वाढली आहे. वाईट प्रवृत्तीची लोकं मुलांच्या निष्पाप फोटोंचा वापर डीपफेक व्हिडिओ किंवा आक्षेपार्ह गोष्टी तयार करण्यासाठी करू शकतात.

7/9
शेअरिंगमुळे केवळ सुरक्षिततेवरच परिणाम होत नाही तर मुलांच्या मनावरही परिणाम होतो. बऱ्याचदा मुलांना कळते की, त्यांच्या फोटोंना, व्हिडिओला लाईक्स आणि कमेंट मिळत आहेत, तेव्हा ते सोशल मीडियाच्या आरशातूनच स्वतःला पाहू लागतात. मुलांचेही आयुष्य हळूहळू सोशल मीडियाच्या विळख्यात येऊ लागते आणि मूळ वास्तविकतेपेक्षा आभासी जगाला जास्त महत्त्व देऊ लागतात.

8/9
म्हणून शक्यतो मुलांचे फोटो शेअर करणं टाळा, तुमचे प्रोफाइल नेहमी खाजगी ठेवा, फोटो अपलोड करताना मुलांचा चेहरा इमोजीने झाका किंवा फक्त पाठमोरा फोटो घ्या. मुलांच्या शाळेचा किंवा घराचा पत्ता कधीही उघड करू नका, तुमचे मूल पुरेसे मोठे असेल तर त्यांचा फोटो अपलोड करण्यापूर्वी त्यांची परवानगी घ्या.

9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'; ट्रम्प यांनी केली जगातील सर्वात मोठी लष्करी घोडचूक
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'
  • इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही!

  • अमेरिकेने छेडला मधमाश्यांचा मोहोळ

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मघातकी डाव

View All
advertisement