Kitchen Tips : 'या' सोप्या युक्त्या वापरून साठवा कॉफी; कितीही दिवस ठेवा, अजिबात होणार नाही कडक!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Simple tricks to store coffee for long time : चहा पिणाऱ्यांप्रमाणे हल्ली कॉफी पिणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. लोकांना कॉफी कोणत्याही स्वरूपात प्यायला आवडते. बरेच लोक बाहेरची कॉफी पिणे पसंत करतात तर काही लोकांना घरीच कॉफी बनवून प्यायला आवडते. मात्र यासाठी घरात कॉफी साठवावी लागते आणि काहीवेळा घरातील कॉफी कडक होते. आज आम्ही तुम्हाला यावरच काही सोपे उपाय सांगणार आहोत.
कॉफीचे अनेक अनेक प्रकार असतात. बहुतांश लोक बाहेर कॉफी पोहतात तर काही आरोग्य आणि वजनाच्या दृष्टीने घरीच बनवलेली हेल्दी ब्लॅक कॉफी पिणे पसंत करतात. मात्र ही कॉफी साठवणे तसे सोपे नसते. योग्य काळजी न घेतल्यास कॉफी लवकरच कडक होते आणि कालांतराने तिची चवही बिघडते. चला पाहूया कॉफी व्यवस्थित ठेवण्यासाठी काही उपाय.
advertisement
advertisement
advertisement
कॉफी योग्य ठिकाणी ठेवा : बऱ्याच लोकांना सवय असते कोणताही पदार्थ जास्त काळ टिकवायचा असेल तर ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. मात्र कॉफीसोबत असे करून चालत नाही. कारण कॉफी सारखी फ्रिजच्या आता बाहेर केल्याने त्यामध्ये ओलावा निर्माण होतो आणि परिणामी कॉफी कडक होऊ लागते. म्हणून कॉफी नेहमी रूम टेम्परेचरवर साठवा.
advertisement
advertisement
advertisement










