advertisement

Pune News: संसार वाचवण्यासाठी शेवटची धडपड, पण एका कॉलने सगळं संपवलं; तरुणासोबत नक्की काय घडलं?

Last Updated:

Shocking Crime News : चिखली येथे पत्नीशी फोनवरून झालेल्या वादानंतर तरुणाने असं काही केलं ज्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. सध्या या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरु असून नेमकं काय झालं ते लवकर समोर येईल.

News18
News18
पिंपरी : लग्नानंतर प्रत्येक जोडप्यांमध्ये वाद होत असतात. काही वाद अनेकदा कोर्टात पोहचतात तर काही समजूतीने मिटूनही जातात. पिंपरी-चिंचवड परिसरात अशाच एक जोडप्यामध्ये वाद झाला पण शेवट इकता भयंकर होईल ते कोणालाही कधीच वाटले नाही.
फोनवरचा तो वाद शेवटचा ठरला 
पिंपरी-चिंचवड परिसरातील चिखली येथे एका 23 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रतीक संदीप घनवटे असे मृत तरुणाचे नाव आहे. पत्नीशी फोनवरून झालेल्या वादानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
फोनवर काय झालं होतं असं?
चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक यांची पत्नी सध्या गुजरात येथे राहत होती. दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते. पत्नीला परत आणण्यासाठी प्रतीक गुजरातला जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच दोघांमध्ये फोनवरून पुन्हा जोरदार वाद झाला.
advertisement
या वादानंतर 6 फेब्रुवारी रोजी प्रतीक याने विष प्राशन केले. त्याला तातडीने पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू ठेवले मात्र उपचारादरम्यान मंगळवारी (10 फेब्रुवारी) त्याचा मृत्यू झाला.
रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिस पुढील तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: संसार वाचवण्यासाठी शेवटची धडपड, पण एका कॉलने सगळं संपवलं; तरुणासोबत नक्की काय घडलं?
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement