Idli : मऊ लुसलुशीत इडली कशी बनवायची? हे काही रॉकेट सायन्स नाही, फक्त 'या' चुका टाळा आणि पाहा जादू

Last Updated:
Soft Spongy Idli Kashi Banvavi : यासाठी काही खास Secrets आणि साधे नियम पाळले की, तुमची इडली दरवेळी कापसासारखी लुसलुशीत आणि जाळीदार बनेल. चला तर मग, इडली मऊ बनवण्याचे अचूक प्रमाण आणि पद्धत सविस्तर जाणून घेऊया.
1/8
इडली खायला प्रत्येकाला आवडते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी इडली हा आवडता पदार्थ आहे. इडल मऊ असल्यामुळे अगदी दात नसेलेल्या बाळापासून ते आजोबांपर्यंत सगळ्यांना खाता येतं. पण जेव्हा इडली बनवण्याचा बेत ठरतो, तेव्हा एक छोटंसं टेन्शन मनात नक्कीच येतं, ते म्हणजे इडली मऊ आणि नरम होण्याचं.

advertisement
2/8
डाळ-तांदूळ भिजवणं, मिक्सर/ग्राइंडरवर वाटणं, आणि रात्री ते पीठ फुगण्यासाठी ठेवणं... इतकी मेहनत करूनही जर इडली कडक झाली, तर सगळा मूड खराब होतो आणि मेहनत वाया गेल्यासारखी वाटते. पण काळजी करू नका इडली मऊ बनवणे हे काही रॉकेट सायन्स नाही. यासाठी काही खास Secrets आणि साधे नियम पाळले की, तुमची इडली दरवेळी कापसासारखी लुसलुशीत आणि जाळीदार बनेल. चला तर मग, इडली मऊ बनवण्याचे अचूक प्रमाण आणि पद्धत सविस्तर जाणून घेऊया.

3/8
1. साहित्य निवड आणि प्रमाण (Ingredients and Accurate Ratio)मऊ इडली बनवण्यासाठी डाळ (Urad Dal) आणि तांदूळ (Idli Rice) यांचे प्रमाण अचूक असणे सर्वात महत्त्वाचे आहे. इडलीसाठी 3 वाटी खास जाड तांदूळ (Idli Rice) वापरा. साधा रेशनचा तांदूळ वापरू नका. 1 वाटी ढोबळी उडीद डाळ (Whole Urad Dal) वापरा. त्याने पीठ जास्त फुलते. मेथीचे दाणे (Fenugreek Seeds)1/2 चमचा मेथीमुळे चांगले फर्मेंटेशन (आंबण्याची प्रक्रिया) होते आणि इडलीला उत्तम चव येते. जाड पोहे (Thick Poha)1/2 वाटीपोहे ऐच्छिक (Optional) आहेत, पण ते वापरल्याने इडलीला अप्रतिम मऊपणा येतो. तांदूळ आणि उडीद डाळ स्वतंत्रपणे किमान 5 ते 6 तास भिजवा.
1. साहित्य निवड आणि प्रमाण (Ingredients and Accurate Ratio)मऊ इडली बनवण्यासाठी डाळ (Urad Dal) आणि तांदूळ (Idli Rice) यांचे प्रमाण अचूक असणे सर्वात महत्त्वाचे आहे.इडलीसाठी 3 वाटी खास जाड तांदूळ (Idli Rice) वापरा. साधा रेशनचा तांदूळ वापरू नका.1 वाटी ढोबळी उडीद डाळ (Whole Urad Dal) वापरा. त्याने पीठ जास्त फुलते.मेथीचे दाणे (Fenugreek Seeds)1/2 चमचा मेथीमुळे चांगले फर्मेंटेशन (आंबण्याची प्रक्रिया) होते आणि इडलीला उत्तम चव येते.जाड पोहे (Thick Poha)1/2 वाटीपोहे ऐच्छिक (Optional) आहेत, पण ते वापरल्याने इडलीला अप्रतिम मऊपणा येतो.तांदूळ आणि उडीद डाळ स्वतंत्रपणे किमान 5 ते 6 तास भिजवा.
advertisement
4/8
2. वाटण्याची (Grinding) खास पद्धतपीठ वाटतानाची पद्धत इडलीच्या मऊपणावर सर्वात जास्त परिणाम करते. उडीद डाळीचे वाटण: सर्वप्रथम उडीद डाळ आणि मेथीचे दाणे खूप थंड पाणी वापरून एकदम बारीक आणि मऊ वाटा. हे पीठ वाटताना जास्त वेळ ग्राइंडर/मिक्सरमध्ये फिरवा, जेणेकरून डाळ फुलून हलकी होईल. डाळ फुलून दोन ते तीनपट झाली पाहिजे. तांदळाचे वाटण: तांदूळ थोडे जाडसर (बारीक रवा) सारखे वाटून घ्या. तांदूळ डाळीसारखा एकदम पेस्ट करू नका. मिश्रण: डाळीचे आणि तांदळाचे पीठ मोठ्या भांड्यात एकत्र करा. पोहे भिजवून शेवटी तांदळासोबत वाटा.
2. वाटण्याची (Grinding) खास पद्धतपीठ वाटतानाची पद्धत इडलीच्या मऊपणावर सर्वात जास्त परिणाम करते.उडीद डाळीचे वाटण: सर्वप्रथम उडीद डाळ आणि मेथीचे दाणे खूप थंड पाणी वापरून एकदम बारीक आणि मऊ वाटा. हे पीठ वाटताना जास्त वेळ ग्राइंडर/मिक्सरमध्ये फिरवा, जेणेकरून डाळ फुलून हलकी होईल. डाळ फुलून दोन ते तीनपट झाली पाहिजे.तांदळाचे वाटण: तांदूळ थोडे जाडसर (बारीक रवा) सारखे वाटून घ्या. तांदूळ डाळीसारखा एकदम पेस्ट करू नका.मिश्रण: डाळीचे आणि तांदळाचे पीठ मोठ्या भांड्यात एकत्र करा. पोहे भिजवून शेवटी तांदळासोबत वाटा.
advertisement
5/8
3. आंबवण्यासाठीचे 'राज' ️हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात इडलीचे पीठ आंबवणे (Fermentation) एक मोठी कटकट वाटते. पण या सोप्या टिप्समुळे ते सहज जमेल.पीठ वाटल्यानंतर फर्मेंटेशनच्या आधी लगेच मीठ घालू नका. इडली बनवण्यापूर्वी अर्धा तास आधी मीठ घाला. मीठ घातल्याने आंबण्याची प्रक्रिया मंदावते.

6/8
हाताचा वापर: पीठ एकत्र करताना हात स्वच्छ धुऊन साधारण 5 मिनिटे हाताने फेटून (Mix) घ्या. आपल्या हाताच्या उष्णतेमुळे फर्मेंटेशनची प्रक्रिया चांगली सुरू होते. पीठ एका मोठ्या भांड्यात ठेवा (पीठ फुगल्यावर बाहेर सांडू नये). हे भांडे ओव्हनमध्ये (बंद करून), किंवा मायक्रोवेव्हमध्ये (बंद करून), किंवा गरम पाण्याच्या मोठ्या भांड्यात ठेवून रात्रभर झाकून ठेवा. यामुळे त्याला हवी असलेली उष्णता मिळेल.साधारण 8 ते 12 तासांत तुमचे पीठ दोनपट फुगलेले दिसेल, म्हणजेच ते इडली बनवण्यासाठी तयार आहे.

7/8
4. इडली शिजवण्याची पद्धत (Steaming the Idli)पाणी गरम करा इडली पात्रात पाणी टाकून पूर्णपणे गरम झाल्यावरच इडली स्टँड ठेवा. साचे तयार करा: इडलीचे साचे तेलाने ग्रीस करा आणि त्यावर चमच्याने पीठ टाका. साचे पूर्ण भरू नका, इडली फुगण्यासाठी जागा ठेवा. इडली साधारण 10 ते 12 मिनिटे हाय फ्लेमवर शिजवा. इडली जास्त शिजवल्यास कडक होते. 12 मिनिटांनंतर सुरी किंवा टूथपिक टोचून बघा. ती स्वच्छ बाहेर आल्यास इडली तयार आहे. लगेच साच्यातून इडली काढू नका. 2 मिनिटे थंड झाल्यावर काढा. त्यामुळे इडली साच्याला चिकटणार नाही आणि तिचा आकार व्यवस्थित राहील. या टिप्स वापरून पाहा आणि पुढील वेळी तुमची इडली मऊ आणि लुसलुशीत बनवून घरातल्यांची मनं जिंका.
4. इडली शिजवण्याची पद्धत (Steaming the Idli)पाणी गरम करा इडली पात्रात पाणी टाकून पूर्णपणे गरम झाल्यावरच इडली स्टँड ठेवा.साचे तयार करा: इडलीचे साचे तेलाने ग्रीस करा आणि त्यावर चमच्याने पीठ टाका. साचे पूर्ण भरू नका, इडली फुगण्यासाठी जागा ठेवा.इडली साधारण 10 ते 12 मिनिटे हाय फ्लेमवर शिजवा. इडली जास्त शिजवल्यास कडक होते.12 मिनिटांनंतर सुरी किंवा टूथपिक टोचून बघा. ती स्वच्छ बाहेर आल्यास इडली तयार आहे.लगेच साच्यातून इडली काढू नका. 2 मिनिटे थंड झाल्यावर काढा. त्यामुळे इडली साच्याला चिकटणार नाही आणि तिचा आकार व्यवस्थित राहील. या टिप्स वापरून पाहा आणि पुढील वेळी तुमची इडली मऊ आणि लुसलुशीत बनवून घरातल्यांची मनं जिंका.
advertisement
8/8
( नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे न्यूज 18 मराठी याची पु्ष्टी करत नाही, आमचा उद्देश आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे. )
( नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे न्यूज 18 मराठी याची पु्ष्टी करत नाही, आमचा उद्देश आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे. )
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement