नखांवरून कळते शरिराची अवस्था, तुमच्या नखांचा रंग कोणता? पांढरा असेल तर...
- Published by:Isha Jagtap
Last Updated:
'माझी नखं स्वच्छ, सुंदर आहेत', हे तुम्ही अनेकजणांकडून ऐकलं असेल. मात्र तुम्हाला माहितीये का, संपूर्ण शरिरातल्या व्याधी नखांच्या फक्त रंगावरून कळतात. त्यामुळे भविष्यात एखाद्या गंभीर आजाराचं निदान होण्यापेक्षा आजच आपल्या नखांचा रंग तपासणं कधीही उत्तम.
advertisement
advertisement
advertisement
जर तुमची नखं काळी पडली असतील तर तुम्हाला किडनीसंबंधित आजार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळूहळू तुमची नखं पूर्ण काळी होतील. कदाचित हा मूतखडे म्हणजेच किडनीस्टोनचा किंवा किडनी फेल झाल्याचा इशाराही असू शकतो. तर, याउलट जर तुमची नखं पांढरी पडली असतील तर शरिरात हिमोग्लोबीनची कमतरता असू शकते. ही कमी भरून काढण्यासाठी तुम्ही बीट, पालेभाज्या, पपई, किवी खाऊ शकता. दूध, डाळिंब आणि इतर फळांचा रसही पिऊ शकता.
advertisement
advertisement






