Shegaon Kachori : 1950 ला सुरुवात, आवडीने खातात खवय्ये कचोरी, पण नेमकी शेगाव येथे आली कशी?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
शेगाव हे एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहेच पण त्याचबरोबर तेथील कचोरी देखील तितकीच फेमस आहे. शेगावला गेलेत आणि शेगावची झणझणीत कचोरी चाखली नाही असं कधीच होत नाही.
advertisement
शेगावला गेलेत आणि शेगावची झणझणीत कचोरी चाखली नाही असं कधीच होत नाही. त्याठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती शेगाव कचोरी घेऊन जातो. आपल्याला अनेक वेळा प्रश्न पडतो की, शेगाव कचोरी इतकी फेमस का असेल? नेमकी त्याची खासियत काय असेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कचोरी नेमकी शेगाव येथे आली कशी? याबाबत माहिती जाणून घेऊ.
advertisement
advertisement
त्यांनी विदर्भातील शेगाव येथील रेल्वे स्टेशनच्या कॅन्टीनसाठी टेंडर भरले होते. त्यांना ते काम मिळाले, आणि 1950 च्या आसपास तिरथराम शर्मा शेगाव रेल्वे स्टेशनला कॅन्टीनचे काम सुरू केले. त्याठिकाणी तिरथराम शर्मा यांनी बनवलेली झणझणीत कचोरी तेथील लोकांना आवडू लागली. त्यानंतर कचोरीला शेगाव कचोरी असे देण्यात आले.
advertisement
त्यानंतर श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणारे प्रत्येक भाविक या कचोरीचा आस्वाद घेऊ लागले. हळूहळू तिरथराम शर्मा यांनी कचोरीच्या चवीत थोडा बदल केला. मुगाच्या डाळीऐवजी त्यांनी बेसन पीठ वापरले आणि विदर्भातील लोकांना आवडेल अशा प्रमाणात ते कचोरी बनवू लागले. त्यानंतर ही कचोरी झपाट्याने फेमस होऊ लागली. त्यानंतर काही वर्षात ही कचोरी फक्त विदर्भच नाही तर महाराष्ट्रातील विविध भागांत पोहोचली. शेगावला येणाऱ्या भाविकांनी ही कचोरी परदेशातही पोहोचवली. बाहेरील देशात हे पार्सल घेऊन जाण्यासाठी त्यांनी फ्रोझन कचोरी बनवली. जी बाहेर 5 दिवस आणि फ्रिजमध्ये 15 ते 20 दिवस टिकते.
advertisement
advertisement
घरातील लोकांच्या व्यतिरिक्त ही कचोरी बनवण्यात ते कोणालाही सामील करून घेत नाहीत. त्याचबरोबर त्यांची रेसिपी ते कोणाला सांगत सुद्धा नाहीत. श्री संत गजानन महाराजांच्या भूमीतून आता ही शेगाव कचोरी विविध भागांत पोहोचत आहे. तिरथराम शर्मा यांच्या कचोरीची चव आणि इतर बाबी बघून त्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. कोणी विचारही करू शकणार नाही, असा हा शेगाव कचोरीचा प्रवास आहे.