advertisement

Kolhapur Accident: इथेनॉल टँकरला भीषण आग, कोल्हापूरहून कोकणात जाणारी वाहतूक विस्कळीत

Last Updated:
आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर आणि रस्ता सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
1/7
गगनबावडा रोडवर इथेनॉल वाहतूक करणाऱ्या टँकरला  अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. टायर फुटल्यामुळे घर्षण निर्माण होऊन ठिणगी पडली आणि त्यातून ही आग भडकल्याची प्राथमिक माहिती आहे.

2/7
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटना घडताच टॅंकरचालकाने प्रसंगावधान राखत वाहन बाजूला थांबवलं आणि तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली.

3/7
अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आलं. मात्र, टँकरचा काही भाग जळून खाक झाला असून इथेनॉलसारख्या ज्वलनशील पदार्थाची वाहतूक असल्याने मोठा अनर्थ टळल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

4/7
आगीच्या घटनेमुळे कोल्हापूरहून कोकणात जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. गगनबावडा रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी तत्काळ वाहतूक नियंत्रणात आणत पर्यायी मार्गांवरून वाहने वळवली.

5/7
आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर आणि रस्ता सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

6/7
टँकरमध्ये असलेल्या इथेनॉलच्या साठ्यामुळे आग वेगाने पसरू शकली असती, मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

7/7
 या प्रकरणी टायर फुटण्यामागील नेमकं कारण आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत चौकशी सुरू असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement