advertisement

अपघाताच्या आदल्यादिवशी अजितदादांना भेटायला येणारा 'तो' विदर्भातला नेता कोण? रोहित पवारांचा फाईलीबद्दल गौप्यस्फोट

Last Updated:

विदर्भातील नेत्याने दादांना या फाईलीवर सही करण्यासाठी आग्रह केला होता. त्यामुळे दादांना दुसऱ्या दिवशी विमानाने जावं लागलं

News18
News18
मुंबई : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर आता पवार कुटुंबातून संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. यावेळी, 'अपघाताच्या आदल्या दिवशी  मुंबईत अजितदादांना एक पूर्व विदर्भातला मोठा नेता भेटायला येणार होता. विदर्भातील नेत्याने दादांना या फाईलीवर सही करण्यासाठी आग्रह केला होता. त्यामुळे दादांना दुसऱ्या दिवशी विमानाने जावं लागलं' असा गौप्टस्फोट रोहित पवार यांनी केला.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी विमानाचा अपघात कसा झाला, विमान कोणत्या कंपनीचं आहे, याबद्दल धक्कादायक अशी माहिती दिली. यावेळी अजितदादा मुंबईत आपल्या निवासस्थानी होते, त्यावेळी काय घडलं याचीही माहिती दिली.
२७ जानेवारी रोजी वेळापत्रकानुसाार दादा संध्याकाळी मुंबईहून गाडीने पुण्यात येणार होते. ताफा देखील लागला होता. पण दादा निघाले नाहीत. पण गाडीने जाऊ शकले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचं विमान २७ तारखेला बूक केलं होतं. अपघाताच्या आदल्या दिवशी पूर्व विदर्भाच्या एका नेत्याने दादांना एका फाईलवर सही करण्यासाठी आग्रह केला होता. ती फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी वेळ लागला. दादांचा त्यामध्ये बराच वेळ गेला. तसेच त्यांच्याच पक्षाचा एक बडा नेता दादांना भेटायला येणार होता. पण तो यायला खूपच उशीर झाला. दादांचा मोबाईल चेक करा, लँडलाईन फोन चेक करा. त्या फाईलीवर सही करायची होती, दादा कोणतीही फाईल रिकामी ठेवत नाही.एक मोठा नेता बोलत असेल तर दादांनी फाईलीवर सही केली. त्यामुळे वेळ गेला. त्यामुळे कारने जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जायचं ठरवलं. यामागे काही नियोजन होतं का हे तपासण्याची गरज आहे' अशी मागणी रोहित पवारांनी केली.
advertisement
तसंच, 'मुंबईत तिथे आमच्या जिवा भावाची माणसं आहे, काही कर्मचाऱ्यावर आमचा विश्वास होता, तेव्हा चर्चेतून माहिती आली, कोणता तरी राजकीय कन्सलंट होता, त्याच्याकडून काहीच मिळत नाही, त्यामुळे हा कंत्राट रद्द करायचा होता, तो शेकडो कोटींचा कंत्राट होता, तो रद्द करायचा होता. बारामतीत हॉस्टेलमध्ये आम्ही भेटलो होतो, दादांनी काही लोकांना सांगितलं होतं, आम्हाला राजकारणात शहाणपण शिकवू नका. सर्व्हे तुम्ही करा अशी चर्चा झााली होती. त्यामुळे दादांना यायला उशीर झाला' असा खुलासा रोहित पवारांनी केला.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
अपघाताच्या आदल्यादिवशी अजितदादांना भेटायला येणारा 'तो' विदर्भातला नेता कोण? रोहित पवारांचा फाईलीबद्दल गौप्यस्फोट
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement