Nagpur Weather: विदर्भाला वादळी पाऊस झोडपणार, आज पुन्हा अलर्ट, पाहा हवामान अंदाज

Last Updated:
Vidarbha Weather: विदर्भात वादळी पावसाचा जोर वाढला असून पुढील काही दिवस हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. आज नागपूसह सर्व जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
1/5
विदर्भात मागील काही दिवसांपासून पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज 14 मे रोजी सुद्धा या भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांमध्येही अशाच प्रकारची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

advertisement
2/5
विदर्भातील बहुतांश भागांत आज ढगाळ वातावरण असून, तापमानात चढ-उतार दिसून येत आहेत. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसपासून 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत आज वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

3/5
पावसामुळे विदर्भात काही प्रमाणात गारवा जाणवेल, मात्र वीज आणि वादळी वाऱ्यांचा वेग लक्षात घेता सतर्क राहणे आवश्यक आहे. हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

4/5
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

5/5
विजांच्या कडकडाटादरम्यान उघड्यावर न जाणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवणे, शक्यतो घरातच राहणे आणि हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. शेतीची कामे थोडी पुढे ढकलावी, हवामानाचा अंदाज घेऊनच शेतीची पूर्ण कामे करावीत, यासर्व सूचनांचे पालन नागरिकांनी करणे गरजेचे आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement