Nagpur Weather: वादळी वारे अन् अवकाळी संकट, विदर्भात पुन्हा अलर्ट, 24 तास महत्त्वाचे!
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Vidarbha Weather: विदर्भातील 7 जिल्ह्यांन आज पुन्हा वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
मे महिन्याच्या सुरवातीपासूनच राज्यातील तापमानात मोठे बदल घडून आलेत. सद्यस्थितीमध्ये राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांत विदर्भासह इतरही ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. आज 8 मे रोजी सुद्धा विदर्भात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना 8 मे साठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामानातील या बदलांनुसार खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः विजांच्या गडगडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement










