'रॅलीत किलोभर लाडू वाटले, आता यांचं कार्यालय जाळून टाका, गुन्हे दाखल करा' शिंदेंच्या सेनेची महिला सैनिक ढसाढसा रडली, PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
"यांचं सगळं कार्यालय जाळून टाकायचं. यांच्या मंत्र्या संत्र्यांवर गुन्हे दाखल करायचे. लाडकी बहिण म्हणताय अन् उमेदवारी देत नाही. कुठे आहे यांची लाडकी बहिण,कार्यकर्त्याला एकाला पण तिकीट नाहीये" (अविनाश कानडजे, प्रतिनिधी)
राज्यात महापालिका निवडणुकीसाठी तिकीट मिळावं यासाठी इच्छुक उमेदवारांनी अक्षरश: देव पाण्यात ठेवले आहे. तिकीट मिळवण्यासाठी पक्ष कार्यालयाबाहेर उच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांसह रांगा लावून आहे. काही जणांना तिकीट मिळत आहे, तर काही जणांना नाकारलं जात आहे. त्यामुळे महायुतीपासून ते महाविकास आघाडीमध्ये नाराजांचा उद्रेक झाला आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकारी महिला शादरा घुले पाटील या कार्यालयात ढसाढसा रडल्या.
advertisement
advertisement
आता मला काही करता झालं तर मला एक मिनिट लागत नाही एटॅक यायला. यांचं सगळं कार्यालय जाळून टाकायचं. यांच्या मंत्र्या संत्र्यांवर गुन्हे दाखल करायचे. लाडकी बहिण म्हणताय अन् उमेदवारी देत नाही. कुठे आहे यांची लाडकी बहिण,कार्यकर्त्याला एकाला पण तिकीट नाहीये. लाडकी बहीण लाडकी बहिण म्हणताय मग तिकीट का देत नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
एका महिला पदाधिकाऱ्याला भाजपकडून जागा काढू शकत नाही, तर पुढे काय होईल, मी सांगू शकत नाही. आता हे नेते आणि मंत्री काहीच कामाचे नाही. मला न्याय मिळाला नाही, तर मी काय करेल सांगू शकत नाही. मी हॉस्पिटलमधून आले आहे, माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर याला जबाबदार पक्ष राहणार आहे, असा इशाराही शारदा घुले पाटील यांनी दिला.










