पावसाळ्यात फिरण्यासाठी लोकेशन शोधताय? ही आहे ठाण्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे, photos
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
आता सध्या जून महिना सुरू झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वच जण निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या जागा शोधत असतात. अनेकजण अशा ट्रिपही काढत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास जागांबाबत सांगणार आहोत. मुंबईतील या सर्व धावपळीच्या आणि गोंगाटाच्या जीवनशैलीत ठाण्याच्या मध्यवर्ती भागात अशा काही जागा आहेत. पावसाळ्यात फिरण्यासाठी ठिकाण शोधताय तर ठाण्यातील या पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या. (साक्षी पाटील, प्रतिनिधी)
1) नाणेघाट - नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. हा घाट एक प्राचीन व्यापारी मार्गाचा भाग होता. नाणेघाट हा समुद्रसपाटीपासून साधारणतः 838 मीटर इतक्या उंचीवर आहे. ब्राह्मी लिपी आणि मध्य इंडो-आर्यन बोलीतील संस्कृत शिलालेख असलेल्या प्रमुख गुहेसाठी नाणेघाट प्रसिद्ध आहे. सुंदर निसर्गदृश्ये, विशेषत: पावसाळ्यात, प्राचीन सातवाहन लेणी, ट्रेकिंगचा मार्ग आणि पावसामुळे ओल्याचिंब झालेल्या पायऱ्यांमुळे नाणेघाट ट्रेक संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय ट्रेक आहे. ठाणे बस स्थानकापासून हे ठिकाण 140 किलोमीटर अंतरावर आहे.
advertisement
2) घोडबंदर किल्ला - सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक म्हणजे 16व्या शतकात बांधलेला ठाण्यातील घोडबंदर किल्ला. घोड म्हणजे घोडे आणि बंदर म्हणजे किल्ला या दोन शब्दांवरून या ठिकाणाचे नाव पडले असावे, असे म्हटले जाते. घोडबंदर किल्ल्याला सुमारे 500 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पोर्तुगिज, मराठा आणि ब्रिटिश असे तिन्ही सत्ता पाहिलेला असा हा किल्ला. तुम्हालाही जर पावसाळ्यात गडकिल्ले फिरण्याची आवड आहे. त्यांनी इथे नक्की भेट द्यायला हवी.
advertisement
3) तानसा धरण - तानसा हे धरण ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा करणारे महत्वाचे धरण आहे. 1925 मध्ये हे धरण बांधण्यात आले होते. तानसा धरण हे एक मोठे गुरुत्वाकर्षण असणारे धरण असल्यामुळे हे पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ म्हणून देखिल प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात अनेकजण या भरलेल्या तलावाला पाहण्यासाठी येतात. या धरणाच्या आजूबाजूचा परिसर नयनरम्य आहे. ठाणे बस स्थानकापासून हे धरण 60 किलोमीटर अंतरावर आहे.
advertisement
4) एल्विस बटरफ्लाय गार्डन - एल्विस बटरफ्लाय गार्डन हे 135 पेक्षा जास्त फुलपाखरांच्या प्रजातींचे घर आहे. इथे वेगवेगळ्या रंगाचे आणि ढंगाचे फुलपाखरू पाहायला मिळतात. पावसाळ्यात येथील फुलपाखरांची दृश्ये डोळ्यांची पारणे फिटवणारी असतात. तुम्हालाही फुलपाखरांबद्दल त्यांच्या प्रजातींबद्दल आणखी जाणून घ्यायचं असेल तर येत्या पावसाळ्यात या एल्विस बटरफ्लाय गार्डनला जाऊन यायला विसरू नका.
advertisement
5) उपवन तलाव - ठाणे जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. याच ठाण्यातील महत्त्वाचे तलाव म्हणजे उपवन तलाव. उपवन तलाव हा महाराष्ट्रातील सुंदर आणि प्रमुख तलावांमध्ये येतो. या तलावाभोवती होणाऱ्या सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी हे तलाव पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात उपवन तलावाचा परिसर निसर्गरम्य दिसतो. हेच अनुभवण्यासाठी आणि पाहण्यासाठी अनेक पर्यटक पावसाळ्यात या ठिकाणाला भेट देतात.
advertisement
6) कचराळी तलाव - ठाणे-पश्चिम येणारा कचराळी तलाव हे ठाणे शहरातील पावसाळ्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. कचराळी तलाव हे मांजरीकरिता प्रसिद्ध असून इथे हजारोंच्या संख्येने मांजरी आढळतात. ठाणे-पश्चिममधील अनेक आजूबाजूचे लोकं पाऊस पडून गेल्यानंतर जॉगिंगसाठी खेळण्यासाठी गप्पागोष्टी करण्यासाठी या कचराळी तलावाच्या आजूबाजूला असणाऱ्या परिसरात जमतात. संध्याकाळी आणि सकाळी या तलावाच्या आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य असतो. तुम्हालाही जर गजबजाट असणारा ठाण्यात एखाद्या शांत ठिकाणी जायचे असेल तर आवर्जून या कचराळी तलावाला भेट द्या. ठाणे स्थानकापासून कचराळी तलाव हे फक्त अर्ध्या तासावर आहे.
advertisement
7) येहुर हिल्स - ठाण्यातील येहुर हिल्स हे ठिकाण विशेषतः पावसाळ्यामध्ये निसर्गरम्य वातावरणासाठी आणि फोटोशूट साठी प्रसिद्ध आहे. अनेक ट्रेकर्स दरवर्षी याठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रेकिंगसाठी येतात. याठिकाणी अनेक धबधबे, हिरवळ, निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे पर्यटक पाऊस सुरू झाल्यानंतर इथे भेट द्यायला येतात. ठाणे स्थानकापासून येऊर हिल्स हे ठिकाण दहा किलोमीटर अंतरावर आहे.


