Tulsi Vivah 2025: तुळशी विवाहच्या दिवशी दूर होतील सर्व समस्या, काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील देवउठनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच द्वादशी तिथीला तुळशी विवाह संपन्न होतो. हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाहाचे खूप महत्त्व आहे आणि खूप शुभ मानले जाते. तुळस ही पवित्रता आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहे, असे मानले जाते. तुळशीचे रोप लावल्याने वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तुळशी विवाहाच्या दिवशी, सकाळपासूनच पवित्रता आणि भक्तीचे वातावरण राखणे उचित आहे. सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर सूर्यदेवाला जल अर्पण करा. भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि तुळशीची योग्य विधींनी पूजा करा. तुळशीला सोळा वस्तू अर्पण करा. या दिवशी दान करण्याची देखील एक परंपरा आहे. गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पैसे दान करणे शुभ मानले जाते.


