वर्ध्यात आढळला दूर्मिळ पक्षी, तब्बल 146 प्रजातींची नोंद, बोरच्या वैभवात भर, Photos

Last Updated:
यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांनी ग्रेट बॅकयार्ड पक्षी गणनेत आपला सहभाग नोंदविला. या पक्षी गणनेत वर्धा जिल्हा राज्यात 13 व्या क्रमांकावर आहे.
1/9
नुकतेच भारतात आंतरराष्ट्रीय ग्रेट बॅकयार्ड पक्षी गणना झाली. यामध्ये देशातील देशातील 37 राज्यांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये 389 पक्षी प्रजातींसह महाराष्ट्र पाचव्या स्थानावर आहे.

advertisement
2/9
विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांनी ग्रेट बॅकयार्ड पक्षी गणनेत आपला सहभाग नोंदविला. या पक्षी गणनेत वर्धा जिल्हा राज्यात 13 व्या क्रमांकावर आहे.

3/9
जिल्ह्यातील विविध अधिवासात पक्षी निरीक्षकांनी केलेल्या पक्षी निरीक्षणात 146 पक्षी प्रजातींची नोंद झाली. याबाबत माहिती 'ebird.org' या संकेत स्थळावर नोंदवण्यात आली आहे.

4/9
वर्धा जिल्ह्यात आढळणाऱ्या एकूण पक्षी प्रजातींपैकी 48 टक्के प्रजातींचे दर्शन या चार दिवसीय पक्षी गणनेमध्ये झाले. यात सेवाग्राम रुग्णालयाच्या परिसरात पक्षी निरीक्षण करत 40 पक्षी प्रजाती नोंदविण्यात आल्या.

5/9
पक्षी अभ्यासक राहुल वकारे आणि पवन दरणे यांना बोर धरणाच्या परिसरात टिकेलचा लीफ वार्बलर हा पक्षी आढळला. याचे शास्त्रीय नाव 'फिलोस्कोपस अॅफिनिस असे आहे. ही वर्धा जिल्ह्यातील पहिलीच नोंद आहे. या नोंदीने वर्धाच्या आणि बोर व्याघ्र प्रकल्पाच्या पक्षी वैभवात भर पडली आहे.

6/9
वर्धा येथे नोंदवण्यात आलेल्या पक्षी प्रजातीमध्ये जागतिक आययुसीएन या संघटनेद्वारे वर्गीकरण करण्यात आल्यानुसार असुरक्षित वर्गात मोडणारे नदी सुरय, संकट समीप वर्गातील पक्षी आढळले. यात मोठा करवानक, काळ्या शेपटीचा पाणटिवळा, तिरंदाज, काळा शराटी, पांढऱ्या मानेचा करकोचा व करण पोपट आढळले.

7/9
वर्धा येथील रोठा तलाव, दिग्रस तलाव, बोर व्याघ्र प्रकल्पाजवळील भाग, जामणी येथील मदन उन्नई धरण, आर्वी येथील सारंगपुरी तलाव व शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज, सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाचा परिसर अशा विविध ठिकाणी असलेल्या अधिवासात पक्षी निरीक्षकांनी पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या.

8/9
पक्षी निरीक्षणात महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे कार्यकारी सदस्य दिलीप विरखडे, विदर्भ समन्वयक राहुल वकारे, डॉ. चेतना उगले, मनीष ठाकरे, सफल पाटील, श्रीकांत वाघ, पवन दरणे, शंतनू बोरवार, प्रियांका नेहेते, प्रकाश भोयर आणि विनोद साळवे यांनी पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या.

9/9
महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, डॉ. गजानन वाघ, किरण मोरे, डॉ. सुधाकर कुन्हाडे, वनवि- भागाचे माजी वनपाल अशोक भानसे, प्रशांत काकडे, अविनाश भोळे तसेच आदींनी सहकार्य केले.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement