निवृत्त शिक्षकाची किमया, चक्क पुण्यात पिकवलं हिमालयातील फळ
- Published by:News18 Marathi
Last Updated:
सफरचंद म्हंटल की सगळ्यांना जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश आठवतं. पण आता हेच सफरचंद पुण्यात पिकतंय.
सध्याच्या काळात शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. सफरचंद म्हंटल की सगळ्यांना जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश आठवतं. पण आता हेच सफरचंद पुण्यातील इंदापूर तालुक्यात पिकतंय. सणसर येथील शेतकरी प्रभाकर खरात यांनी सफरचंदाची शेती केलीय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पहिल्यांदा खरात यांनी सफरचंदाचा 10 गुठ्यांतील प्रयोग यशस्वी केला. त्यामुळे सर्वत्र या शेतीची चर्चा होत आहे. नंतर त्यांनी पुन्हा 10 गुंठे सफरचंदाची लागवड केली. गेल्या 4 वर्षांपासून ते सफरचंदाची शेती करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी या फळ बागेसाठी कुठल्याही रासायनिक औषधांचा आणि खतांचा वापर केला नाही.
advertisement
advertisement