पती बीटेक, तर पत्नी एमबीए, नोकरी करता-करता क्यूट कपलनं सुरू केलं स्टार्टअप, नावही यूनिक
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
आज आम्ही तुम्हाला एका अशा पती पत्नीची कहाणी सांगणार आहोत, जे उच्चशिक्षित आहेत, तसेच नोकरी करता करता आपल्या स्वत:चा व्यवसायही करत आहेत. माझा पहिला क्रश मोमोज या यूनिक नावाने त्यांनी मोमोज विक्रीचा स्टॉल सुरू केला आहे. त्यांच्या या स्टॉलला सर्वांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. (आग्रा/हरिकांत, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
दीपक सारस्वत आणि साक्षी गौतम असे या पती पत्नीचे नाव आहे. त्यांचे लग्न 1 वर्षांपूर्वी झाले. ते आग्राच्या रामबाग येथील रहिवासी आहेत. दिपक सारस्वत याने हिंदुस्थान कॉलेज येथून बीटेक केले तर त्याची पत्नी साक्षी गौतम हिने एमबीएचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती उत्तम इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement