Gold, silver prices fall: मोठी भविष्यवाणी! चांदी थेट ४०,००० रुपयांनी स्वस्त होणार? सोनं किती खाली येणार; एक्सपर्ट्सचा 'हा' सल्ला महत्त्वाचा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सोन्या चांदीच्या दरात अजय केडिया यांच्या मते ८ ते १२ टक्के घसरण, HUID सिस्टीम, ३% GST, गुंतवणुकीसाठी गोल्ड ईटीएफ आणि सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स उत्तम पर्याय.
सोन्या चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाल्यानंतर पुन्हा हळूहळू वाढ होत असल्याचं दिसत आहे. सोन्या चांदीच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. आता घसरण होऊन पुन्हा दरवाढ होईल असं सांगितलं जात आहे. साधारण 40 हजार रुपयांची घसरण होऊ शकते. आगामी काळात जर तुम्ही सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
advertisement
पुढील २ ते ३ वर्षांत जर तुमच्या घरात लग्न किंवा कोणताही मोठा समारंभ असेल, तर तुम्ही आत्ताच दागिन्यांच्या रूपात सोने खरेदी करणे अधिक चांगलं. असं केल्याने तुम्हाला भविष्यात वाढणारे मेकिंग चार्जेस आणि डिझाईन बदलण्याचा अतिरिक्त खर्च वाचवता येईल. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल: दागिने विकताना किंवा एक्सचेंज करताना मेकिंग चार्ज परत मिळत नाही, ज्यामुळे तुमच्या मूळ गुंतवणुकीवरील रिटर्न्स कमी होतो.
advertisement
जर तुम्हाला सोने किंवा चांदी केवळ गुंतवणुकीसाठी पाहिजे असेल आणि त्याचा त्वरित वापर करण्याची गरज नसेल, तर नाणी किंवा बार खरेदी करणे अधिक व्यवहार्य आहे. यावर मेकिंग चार्ज कमी लागतो आणि गरज पडल्यास ते सहजपणे विकता येतात किंवा एक्सचेंज करता येतात. याशिवाय, गोल्ड ईटीएफ किंवा सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स मध्ये गुंतवणूक करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. कारण, यात तुम्हाला सोन्याच्या सुरक्षेची चिंता करण्याची गरज नसते, तसेच मेकिंग चार्जचा तोटाही होत नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement