सर्वाधिक Gold असणारं राज्य कोणते? नंबर १ राज्याकडे तब्बल २२२.८ मिलियन टन सोन्याचा साठा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
भारतातील सोन्याच्या साठ्यात बिहार पहिल्या क्रमांकावर असून जमुई जिल्ह्यात २२२.८ दशलक्ष टन सोनं आहे. राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश पुढे आहेत.
भारतीय स्त्री आणि सोनं एक वेगळंच नातं आहे. सणवार असो नसो सोनं घालून मिरवण्यात जी मौज आहे त्याची सर मात्र कशाला नाही. भारत हा असा देश आहे जिथे सोने केवळ दागिन्यांचे प्रतीक नाही तर संपत्ती आणि परंपरेचे देखील प्रतीक आहे. प्रत्येक घरातील स्त्रीकडे सोनं असतं. भारतातल्या स्त्रीकडेच नाही तर धरतीखाली देखील सोन्याची खाण लपलेली आहे. कोणत्या राज्यात किती सोनं आहे? कोणत्या राज्यात सोन्याचा सर्वात जास्त साठा आहे हे आज जाणून घेणार आहोत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बिहार पहिल्या क्रमांकावर आहे. बिहारमध्ये भारतातील सर्वात मोठे सोन्याचे साठे आहेत. येथील जमुई जिल्ह्यात एकूण सुवर्ण खनिज संसाधनांपैकी सुमारे ४४ टक्के म्हणजे अंदाजे २२२.८ दशलक्ष टन सोन्याचे साठे आहेत. हे आकडे सूचित करतात की बिहार भविष्यात एक प्रमुख सोन्याचे केंद्र बनू शकते आणि येथे खाणकाम सुरू झाल्यास आर्थिक विकासाला चालना मिळेल.


