Reliance Family Day कार्यक्रमातील मुकेश अंबानी यांच्या भाषणातील मुद्दे PHOTOS
- Published by:Devika Shinde
Last Updated:
धीरूभाई अंबानी यांचा वाढदिवसानिमित्त 28 डिसेंबर रिलायन्स फॅमिली डे म्हणून साजरा होतो. या दिवशी आपल्या रिलायन्स ग्रुपबद्दल अनेक गोष्टींबद्दल मुकेश अंबानी यांनी वक्तव्य केलं आहे.
यावेळी रिलायन्स ग्रुपमध्ये काम करणाऱ्या आणि जोडल्या गेलेल्या लोकांसाठी मुकेश अंबानी म्हणाले, ''एकात्मता, उत्कृष्टता, सहानुभूती, सहकार्याची भावना आणि प्रत्येकासाठी प्रत्येक आजपेक्षा प्रत्येक उद्या अधिक चांगला करण्याची वचनबद्धता. ही मूल्यं रिलायन्सच्या व्ही केअर तत्त्वज्ञानामध्ये अंतर्भूत आहेत. आम्ही प्लॅनेट आणि मानवतेची काळजी घेतो. आम्ही आमच्या भारत मातेची आणि प्रत्येक भारतीयाची काळजी घेतो.''
advertisement
''आता दोन दशकांहून अधिक काळ रिलायन्सचं नेतृत्व करणं हा माझ्यासाठी जीवनाचा सन्मान आहे. जर रिलायन्सचं नेतृत्व करणं हा माझा अभिमान आहे, तर तुम्हा सर्वांसोबत काम करणं हा माझा विशेषाधिकार आहे. तुम्ही अतुलनीय प्रतिभावान व्यक्तींची फौज आहात जी धीर आणि शिस्तीने दिवसेंदिवस आश्चर्यकारक काम करतात. मला तुमच्या प्रत्येकाचा अभिमान आहे. तुम्ही माझी शाश्वत रिचार्ज बॅटरी आहात. प्रत्येक दिवशी तुम्ही माझ्या उत्साहाचे नूतनीकरण करता, माझी ऊर्जा वाढवता आणि आमच्या संस्थापकाने ज्या उद्देशासाठी रिलायन्सची स्थापना केली त्याचे प्रमाणीकरण करता. रिलायन्समध्ये तुम्ही दिलेल्या योगदानाबद्दल मी तुमच्यापैकी प्रत्येकाचा मनापासून आभारी आहे.'' असं देखील मुकेश अंबानी आपल्या भाषणात म्हणाले.
advertisement
मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचा यशस्वी होण्याचा मंत्र देखील सांगितला. ते म्हणाले, ''जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. त्यामुळे रिलायन्ससमोर एक मोठी सुवर्णसंधी आहे. जगातल्या 10 मोठ्या कंपन्यांपैकी एक यशस्वी कंपनी होण्याची ही संधी आहे, जिचं सोनं रिलायन्स करेलच. फक्त त्यासाठी आपल्याला तीन बाबींवर लक्ष केंद्रीत करणं आवश्यक आहे.''
advertisement
advertisement
advertisement
रिलायन्समधील सर्व वरिष्ठ आणि मध्यम-स्तरीय नेते आता त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत याचंही मला खूप कौतुक वाटतं - तरुणांवर विश्वास ठेवणं. तरुणांना सक्षम बनवणं. तरुणांना मार्गदर्शन करणं. तरुण लीडर चुका करतील. ते मात्र नक्की. पण माझा त्यांना सोपा सल्ला आहे, भूतकाळातील चुकांचं पोस्टमॉर्टेम करण्यात आपली शक्ती वाया घालवू नका. उलट त्याच चुका पुन्हा न करायला शिका. असं देखील मुकेश अंबानी पुढे म्हणाले.
advertisement
advertisement






