30 हजार रुपयांची लाच भोवली, अधिकाऱ्यांनी बॅगा उघडल्या आणि चाट पडले, नोटा मोजायला मशीन कमी पडल्या
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
ओडिशातील खाण विभागाचे उपसंचालक देबव्रत मोहंती लाच प्रकरणात अटकेत, भुवनेश्वर येथून ४ कोटींपेक्षा जास्त रोकड जप्त, मोठ्या प्रमाणात मालमत्ता उघड.
advertisement
विशेष म्हणजे, अवघ्या ३० हजार रुपयांच्या लाचेच्या प्रकरणातून सुरू झालेला हा तपास थेट कोटींच्या घबाडापर्यंत पोहोचला. मिळालेल्या माहितीनुसार, एका परवानाधारक कोळसा विक्रेत्याकडून त्याचे काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी आणि कोळसा वाहतुकीची परवानगी देण्यासाठी मोहंती यांनी ३० हजार रुपयांची लाच मागितली होती.
advertisement
मंगळवारी रात्री ही लाच स्वीकारताना दक्षता विभागाने त्यांना रंगेहात पकडले. या ट्रॅप नंतर विभागाने मोहंती यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी तीन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. दक्षता विभागाने जेव्हा मोहंती यांच्या पटिया येथील 'नेचर्स क्रेस्ट अपार्टमेंट'मधील फ्लॅटची झडती घेतली, तेव्हा अधिकारीही चक्रावून गेले.
advertisement
घरातील कपाटं आणि ट्रॉली बॅग्समध्ये नोटांची पुडकी गच्च भरलेली होती. या एकाच ठिकाणाहून ४ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. नोटा मोजण्याचे काम अद्याप सुरू असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, कटक येथील त्यांच्या कार्यालयातून १ लाख २० हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement







