advertisement

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्था राजकारणात मोठी उलथापालथ होणार, सरकारचा गेमचेंजर निर्णय, कोणाला मिळणार फायदा?

Last Updated:

Local Body Election: राज्य सरकारने नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या नियमांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था राजकारणात मोठी उलथापालथ होणार, सरकारचा गेमचेंजर निर्णय, कोणाला मिळणार फायदा?
स्थानिक स्वराज्य संस्था राजकारणात मोठी उलथापालथ होणार, सरकारचा गेमचेंजर निर्णय, कोणाला मिळणार फायदा?
मुंबई: राज्य सरकारने नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या नियमांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील सुधारणा विधेयक आज विधिमंडळाच्या पटलावर ठेवले जाणार असून, यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

एकाच वेळी अध्यक्ष आणि सदस्य राहता येणार

नव्या सुधारणा विधेयकानुसार, आता एकच व्यक्ती एकाच वेळी अध्यक्ष आणि सदस्य अशा दोन वेगवेगळ्या जागांवर निवडणूक लढवू शकेल. इतकेच नाही तर, दोन्ही जागांवर निवडून आल्यास संबंधित व्यक्तीला दोन्ही पदे एकाच वेळी धारण करण्याची मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी अशा परिस्थितीत एका पदाचा राजीनामा द्यावा लागत असे, मात्र आता दोन्ही पदे कायम ठेवता येणार आहेत.
advertisement

मतदानाचे अधिकार आणि 'निर्णायक मत'

या दुहेरी पदभारामुळे मतदानाच्या प्रक्रियेत काही विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. संबंधित व्यक्तीला सभागृहात सदस्य म्हणून मतदान करताना केवळ एकदाच मतदान करता येईल.
जर एखाद्या विषयावर मतदान करताना सत्ताधारी आणि विरोधकांची मते समसमान पडली आणि पेचप्रसंग निर्माण झाला, तर अशा वेळी त्या व्यक्तीला अध्यक्ष म्हणून 'निर्णायक मत' (Casting Vote) देण्याचा विशेष अधिकार असेल.
advertisement

राजकीय वर्तुळात चर्चा

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर नेत्यांचे वर्चस्व वाढण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः लहान नगर पंचायतींमध्ये जिथे संख्याबळाची चुरस असते, तिथे अध्यक्षांना आता अधिक ताकद मिळणार आहे. विरोधक या विधेयकावर काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्था राजकारणात मोठी उलथापालथ होणार, सरकारचा गेमचेंजर निर्णय, कोणाला मिळणार फायदा?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement