advertisement

devendra fadnavis japan tour : बुलेट ट्रेन ते जपानी मंदिर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यातील खास PHOTOS

Last Updated:
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस जपानमध्ये पोहोचले आहे. या दौर्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत. (तुषार शेटे, न्यूज को-ऑर्डिनेटर, न्यूज18 लोकमत)
1/15
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौर्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत. जायका, जेट्रो, जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदारांच्याही ते या दौर्‍यात भेटी घेणार असून, जपान-इंडिया असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनाही ते भेटणार आहे.

2/15
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या विशेष निमंत्रीत म्हणून जपानच्या दौऱ्यावर आहे. त्यांना Z+ ची सुरक्षा आहे. राज्यात, देशात फिरताना त्यांना मागे पोलीस अधिकारी, सुरक्षा रक्षक यांचा ताफा असतो. हवं नको ते एका हाकेत मिळत असतं. मात्र जपानच्या दौऱ्यावर फडणवीस त्यांची बॅग, जॅकेट स्वत: घेऊन जाताना दिसून आले. विमातळावरून बाहेर पडताना, त्यांचा मागे अनेक काही अधिकारी दिसून आले. मात्र उपमुख्यंमत्र्यांप्रमाणे तेही त्यांच्या बॅगा स्वत:च घेऊन जाताना दिसते.

3/15
इतकंच काय तर जेव्हा क्योटो स्टेशनवर पोहोचले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी जपान सरकारचे स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. हातात बॅग आणि जॅकेट घेऊन बाहेर पडताना फडणवीसांना पहात ते सुध्दा थक्क झाले.

4/15
इतकंच काय तर विमानळाबाहेर पार्क केलेल्या गाडीच्या डिकीतही बॅग त्यांनीच स्वहस्ते ठेवली.

5/15
बुलेट ट्रेनमध्ये प्रवेश केल्यानंतर फडणवीस यांनी आपल्या हातानेच बॅग आणि इतर साहित्य इतर प्रवाशांप्रमाणे रॅकमध्ये ठेवले.

6/15
बुलेट ट्रेनमधून प्रवास करत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

7/15
किंकाझू मंदिर आणि झेन बुध्द मंदिरात तिथल्या परंपरेनुसार त्यांनी मंदिराबाहेर लावलेली मोठी घंटा वाजवत मनोभावे दर्शन घेतलं.

8/15
स्वागताची औपचारीकता पूर्ण झाल्यानंतर त्यांनी फडणवीसांच्या हातातली बॅग आणि जॅकेट त्यांच्या हातातून घेत आदरातिथ्य दाखवण्याचा प्रयत्न केला.मात्र फडणवीसांना त्यांना प्राज्वळपणे नकार देत, स्वत:च बॅग हातात घेऊन चालणं पसंद केलं.

9/15
यानंतर ते टोक्यो बुलेट ट्रेन स्टेशनवर पोहोचले. कारमधून उतरल्यानंतर ते क्योटोच्या ट्रेनमध्ये बसेपर्यंत त्यांनी त्यांची बॅग आणि इतर साहित्य स्वत: उचलत ट्रेनमध्ये प्रवेश केला.

10/15
जपानमध्ये दौऱ्यावेळी फडणवीसांचं खास मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी जपानमध्ये राहणाऱ्या मराठी भाषिकांसोबत संवादही साधला. जपानमधल्या भारतीयांच्या किंबहुना मराठी जनतेच्या स्वागताने फडणवीस भारावून गेले होते.

11/15
‘आज जपान दौर्‍याच्या पहिल्याच दिवशी विमानतळावर उतरल्याबरोबर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अभूतपूर्व दर्शन घडले. जपानमध्ये स्थित भारतीयांनी विमानतळावर माझे जंगी स्वागत केले. ज्याप्रमाणे माझे कुटुंबीय माझे औक्षण करतात अगदी तसेच स्वागत माझे जपानमध्ये झाले.

12/15
भारतीयांनी गायलेले 'लाभले आम्हास भाग्य' या गीताने जपान अगदी महाराष्ट्रमय झाल्यासारखे वाटले. खरंच जपानमध्ये आल्यानंतर आपली संस्कृती आणि महाराष्ट्रावरचे प्रेम, आपले भारतीय किंचितही विसरले नाहीत. त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमवर्षावाने मी अतिशय सुखावलो आहे. खूप खूप धन्यवाद जपान या आतिथ्य आणि प्रेमासाठी!’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलीये.

13/15
यामुळे देशातील पायाभूत सुविधा प्रकल्प आणि गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. याशिवाय राज्यातील गुंतवणुकीसंदर्भात काही कंपन्यांसोबत त्यांच्या बैठका सुद्धा होणार आहेत. जपानमधील बुलेट ट्रेन आणि टोकियो मेट्रो ऑपरेशन्सला सुद्धा या दौर्‍यात ते भेटी देणार कळतंय.

14/15
20 ते 25 ऑगस्ट या कालावधीत आयोजित या दौर्‍यात त्यांचे भरगच्च कार्यक्रम राहणार आहेत. आपल्या या दौर्‍यात वाकायामा या शहराला सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत.

15/15
त्यामुळे फडणवीसांच्या या जपानभेटीनंतर राज्याला नव्या कोणत्या बुलेटट्रेनची किंवा आणखी कोणत्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पाची भेट मिळते याकडे राज्याचे डोळे लागले आहेत.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement