Weather Alert: डिसेंबरअखेर वारं फिरलं, हवामानात मोठ्या बदलांची शक्यता, IMD चा अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात डिसेंबरअखेर मोठे बदल जाणवत आहेत. आज 30 डिसेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात डिसेंबरअखेर गारठा वाढला आहे. किमान तापमानात घट होऊन सकाळ आणि रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका अधिक जाणवणार आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरांमध्ये थंडीचा प्रभाव स्पष्टपणे जाणवेल. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यात पावसाची कोणतीही शक्यता नाही.
advertisement
कोकण पट्ट्यात हवामान कोरडे आणि तुलनेने सौम्य राहणार आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत कमाल तापमान 31 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे, तर किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते. सकाळच्या वेळेत काही भागांत हलकं धुके जाणवू शकतं, मात्र दिवसभर आकाश निरभ्र राहील. समुद्रकिनारी आर्द्रता जास्त असल्याने रात्री थंडावा अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement








