Shubman Gill : गिलचं महारेकॉर्ड उद्या उद्ध्वस्त होणार! भारतीय ओपनर 62 रन काढून लिहिणार नवा इतिहास!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारतीय महिला क्रिकेट टीमला पाचवा टी-20 सामना जिंकून श्रीलंकेला व्हाईटवॉश करत वर्षाचा शेवट गोड करण्याची संधी आहे.
मुंबई : भारतीय महिला क्रिकेट टीमला पाचवा टी-20 सामना जिंकून श्रीलंकेला व्हाईटवॉश करत वर्षाचा शेवट गोड करण्याची संधी आहे. या सीरिजमध्ये टीम इंडियाने 4-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधना या सामन्यात शुभमन गिलचा विक्रमही मोडू शकते आणि या वर्षी सर्वाधिक धावा करणारी (पुरुष आणि महिला दोन्ही) खेळाडू बनू शकते, पण यासाठी तिच्याकडे फक्त एकच संधी आहे.
स्मृती मानधना श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या तीन टी-20b सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करू शकली नाही, तिने अनुक्रमे 25, 14 आणि 1 रन केल्या. पण चौथ्या सामन्यात तिने शानदार कामगिरी करत 48 बॉलमध्ये 80 रन केल्या. 166.67 च्या स्ट्राईक रेटने खेळताना स्मृती मानधनाने 3 सिक्स आणि 11 फोर मारल्या.
स्मृती गिलचं रेकॉर्ड तोडणार?
स्मृती मानधनाने 2025 मध्ये 1703 रन केल्या आहेत, या वर्षी स्मृतीची आणखी एक मॅच शिल्लक आहे. यामुळे एका कॅलेंडर वर्षात (तिन्ही फॉरमॅटमध्ये) सर्वाधिक रन करणाऱ्या शुभमन गिलचा विक्रम स्मृतीला मागे टाकता येईल. गिल सध्या या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा बॅटर आहे, त्याने 35 सामन्यांमध्ये 42 डावात 1764 रन केल्या आहेत. यामध्ये 7 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
advertisement
2025 मध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय रन (पुरुष क्रिकेटपटू)
शुभमन गिल - 1764
शाई होप - 1760
जो रूट - 1613
ब्रायन जॉन - 1585
सलमान अली आगा - 1569
स्मृतीला 62 रनची गरज
भारत महिला विरुद्ध श्रीलंका महिला पाचवा टी-20 सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 2025 च्या कॅलेंडर वर्षात शुभमन गिलचा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय रनचा विक्रम मोडण्यासाठी स्मृती मानधनाला 62 रनची आवश्यकता आहे.
advertisement
स्मृती मानधनाने भारतासाठी 7 कसोटी, 117 एकदिवसीय आणि 157 टी-२० सामने खेळले आहेत, या सामन्यांमध्ये तिने अनुक्रमे 629 5,322 आणि 4,102 रन केल्या आहेत. टी-20 सामन्यांमध्ये स्मृतीने एक शतक आणि 32 अर्धशतके केली आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 11:59 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shubman Gill : गिलचं महारेकॉर्ड उद्या उद्ध्वस्त होणार! भारतीय ओपनर 62 रन काढून लिहिणार नवा इतिहास!










