Mumbai Indians : आणखी एक ट्रॉफीसाठी मुंबईने डाव टाकला, नव्या सिझनआधी ऑस्ट्रेलियन क्रिकेटरसोबत डील!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 लीगच्या इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सने त्यांच्या नव्या मोसमाआधी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला टीममध्ये आणलं आहे.
मुंबई : टी-20 लीगच्या इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सने त्यांच्या नव्या मोसमाआधी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला टीममध्ये आणलं आहे. महिला प्रीमियर लीग 2026 च्या आधी गतविजेत्या मुंबई इंडियन्सने त्यांच्या कोचिंग स्टाफमध्ये एक नवीन खेळाडूची भर घातली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीमने स्पिन बॉलिंग प्रशिक्षकाची भर घातली आहे. फ्रँचायझीने माजी ऑस्ट्रेलियन लेग-स्पिनर क्रिस्टन बीम्सला त्यांचा स्पिन बॉलिंग प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. मुंबई इंडियन्सने एका पोस्टमध्ये ही माहिती शेअर केली. एमआयने एक व्हिडिओ देखील शेअर केला ज्यामध्ये क्रिस्टन बीम्सने फ्रँचायझीसोबत काम करण्याबद्दल तिचा उत्साह व्यक्त केला.
फ्रँचायझीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये क्रिस्टन म्हणाली, "प्रशिक्षक म्हणून मी येथे पहिल्यांदाच आले आहे. झुलन गोस्वामीसोबत काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे, ज्यांच्याविरुद्ध मी क्रिकेट खेळले आहे त्यापैकी ती एक आहे. एवढ्या दीर्घ कालावधीत त्यांनी विजयी मालिका निर्माण केली आहे हे अविश्वसनीय आहे. खेळाडूंचा हा ग्रुप किती जवळचा आहे याबद्दल तुम्ही प्रत्येकाला बोलताना ऐकता. ते एका कुटुंबासारखे आहेत. तुम्हाला त्या कुटुंबाचा भाग व्हायचं असतं.''
advertisement
Spin आणि win ची recipe घेऊन #AaliRe
Paltan, let's welcome our new spin bowling coach, Kristen Beams #MumbaiIndians #TATAWPL pic.twitter.com/5xUrJgkaC5
— Mumbai Indians (@mipaltan) December 29, 2025
क्रिस्टन मुंबई इंडियन्समध्ये व्यापक प्रशिक्षणाचा अनुभव घेऊन येत आहे. टीममध्ये मुख्य प्रशिक्षक लिसा कीटली, बॉलिंग प्रशिक्षक आणि मार्गदर्शक झुलन गोस्वामी, बॅटिंग प्रशिक्षक देविका पळशीकर आणि फिल्डिंग प्रशिक्षक निकोल बोल्टन यांचा समावेश आहे. क्रिस्टन बीम्सने ऑस्ट्रेलियासाठी 30 एकदिवसीय सामन्यांमध्ये 22.45 च्या सरासरीने 42 विकेट घेतल्या आहेत. तिने 18 टी-20 सामन्यांमध्ये 20 बळीही घेतले आहेत. बीम्सने ऑस्ट्रेलियासाठी एक कसोटी सामनाही खेळला आहे. क्रिस्टन बीम्सने महिला बिग बॅश लीगमध्ये 45 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने 24.08 च्या सरासरीने 37 बळी घेतले आहेत.
advertisement
प्रशिक्षणाची कारकिर्द
तिच्या प्रशिक्षण कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, क्रिस्टन बीम्सने महिला बिग बॅश लीगमध्ये प्रशिक्षण दिले आहे. तिने ऑस्ट्रेलिया महिला अंडर-19 टीमचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. याव्यतिरिक्त, क्रिस्टनने क्रिकेट ऑस्ट्रेलिया येथे राष्ट्रीय विकास प्रमुख आणि क्रिकेट टास्मानिया येथे कम्युनिटी क्रिकेट व्यवस्थापक-दक्षिण म्हणून काम केले आहे.
मुंबईची तिसऱ्या ट्रॉफीवर नजर
advertisement
दोन वेळची विजेती मुंबई इंडियन्स 9 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या WPL च्या नवीन हंगामात तिसरी ट्रॉफी जिंकण्याचे लक्ष्य ठेवेल. टीममध्ये प्रमुख खेळाडू, ज्यात कर्णधार हरमनप्रीत कौर, नॅट सायव्हर-ब्रंट, हेली मॅथ्यूज, अमनजोत कौर आणि जी. कमलिनी यांचा समावेश आहे, त्यांना लिलावापूर्वी फ्रँचायझीने कायम ठेवले होते. शिवाय, मुंबईने अलिकडच्या T20 विश्वचषकातील प्लेअर ऑफ द टूर्नामेंट अमेलिया केर, तसेच एस. सजना, सईका इशाक, संस्कृती गुप्ता आणि अनुभवी फास्ट बॉलर शबनीम इस्माईल यांनाही परत बोलावले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 11:42 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : आणखी एक ट्रॉफीसाठी मुंबईने डाव टाकला, नव्या सिझनआधी ऑस्ट्रेलियन क्रिकेटरसोबत डील!










