Mumbai: रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांनाच बेस्ट बसने चिरडलं, भांडुपमधील घटनास्थळाचा पहिला VIDEO

Last Updated:

संध्याकाळची वेळ असल्यामुळे नोकरदार आपल्या घराकडे जाण्यासाठी बसच्या रांगेत उभे होते. त्याचवेळी अचानक एक बेस्टची...

News18
News18
मुंबई: मुंबईत ऐन संध्याकाळी नोकरदारांची घरी जाण्याची वेळ असताना भांडुप परिसरात बेस्टच्या बसने 13 ते १५ जणांना चिरडण्याची घटना घडली आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील भांडुप रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या बस डेपोजवळ ही घटना घडली. संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. संध्याकाळची वेळ असल्यामुळे नोकरदार आपल्या घराकडे जाण्यासाठी बसच्या रांगेत उभे होते. त्याचवेळी अचानक एक बेस्टची बस क्रमांक MH 01 -CV- 6515 ही भरधाव वेगात आली आणि रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडून पुढे गेली.
advertisement
या बेस्ट बसने रांगेत उभ्या असलेल्या १३ ते १५  जणांना चिरडलं. या दुर्घटनेमध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर घटनास्थळी आणखी प्रवासी जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, बेस्टची बस ही नियंत्रणाबाहेर गेली होती. बस स्टॉपवर २० ते २५ जण रांगेत उभी होती. त्यावेळी ही बस आली आणि तिने रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडलं आणि पुढे निघून गेली. पुढे गेल्यावर ती एका विजेच्या खांबाला जाऊन धडकली. या बसचा वेग इतका होता की, धडकेनंतर विजेचा खांब ही  कोलमडला.  बस अनियंत्रित झाली होती, त्यामुळे हे सगळं घडलं असावं, असं प्रत्यक्षदर्शी दुकानदाराने सांगितलं.
advertisement
मुळात भांडुप परिसर हा प्रचंड रहदारीने गजबजलेला असतो. संध्याकाळच्या वेळी बस स्टॉपच्या परिसरात नोकरदार वर्ग हा घरी जाण्यासाठी स्थानकावर गर्दी करत असतो. त्याच दरम्यान एक ईलेक्ट्रिक एसटी बस नियंत्रणाबाहेर गेली आणि तिने रांगेत उभ्या असलेल्या लोकांना चिरडलं. घटनास्थळावर दृश्य हे भयानक होतं.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखक केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांनाच बेस्ट बसने चिरडलं, भांडुपमधील घटनास्थळाचा पहिला VIDEO
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement