BMC Election : मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं जागावाटप फायनल, भाजप-शिवसेनेला किती जागा? आकडा ठरला!

Last Updated:

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप अखेर निश्चित झालं आहे. अर्ज भरायला अवघे काही तास शिल्लक असतानाच अखेर भाजप-शिवसेना महायुतीच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं आहे.

मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं जागावाटप फायनल, भाजप-शिवसेनेला किती जागा? आकडा ठरला!
मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं जागावाटप फायनल, भाजप-शिवसेनेला किती जागा? आकडा ठरला!
उदय जाधव, प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप अखेर निश्चित झालं आहे. अर्ज भरायला अवघे काही तास शिल्लक असतानाच अखेर भाजप-शिवसेना महायुतीच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं आहे. मुंबईमधल्या 227 जागांपैकी 137 जागांवर भाजप तर 90 जागांवर शिवसेना लढणार आहे. दोन्ही पक्ष त्यांच्या मित्रपक्षांना त्यांच्या कोट्यातून जागा देणार आहेत. एबी फॉर्मचे वाटप करून उद्या दोन्ही पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.
advertisement
महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकांचे अर्ज भरण्यासाठी 30 डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. अर्ज भरायला अवघे काही तास शिल्लक असतानाच भाजप आणि शिवसेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे.
भारतातली सगळ्यात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका 2017 नंतर पहिल्यांदाच होणार आहेत. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांचा सामना ठाकरे बंधूंविरुद्ध होणार आहे. महापालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र निवडणूक लढवत आहे. तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढत आहेत. याआधी 2017 च्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते, ज्यात शिवसेनेला 84 आणि भाजपला 82 जागांवर यश मिळालं होतं.
advertisement
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी
१. वॉर्ड क्रमांक - २ - तेजस्वी घोसाळकर
२. वॉर्ड क्रमांक ७ - गणेश खणकर
३. वॉर्ड क्रमांक १० - जितेंद्र पटेल
४. वॉर्ड क्रमांक १३ - राणी त्रिवेदी
५. वॉर्ड क्रमांक १४ - सीमा शिंदे
६. वॉर्ड क्रमांक १५ - जिग्ना शाह
७. वॉर्ड क्रमांक १६ - श्वेता कोरगावकर
advertisement
८. वॉर्ड क्रमांक १७ - शिल्पा सांगोरे
९. वॉर्ड क्रमांक १९ - दक्षता कवठणकर
१०. वॉर्ड क्रमांक २० - बाळा तावडे
११. वॉर्ड क्रमांक २३ - शिवकुमार झा
१२. वॉर्ड क्रमांक २४ - स्वाती जैस्वाल
१३. वॉर्ड क्रमांक ३१ - मनिषा यादव
१४. वॉर्ड क्रमांक ३६ - सिद्धार्थ शर्मा
१५. वॉर्ड क्रमांक ३७ - प्रतिभा शिंदे
advertisement
१६. वॉर्ड क्रमांक ४३ - विनोद मिश्रा
१७. वॉर्ड क्रमांक ४६ - योगिता कोळी
१८. वॉर्ड क्रमांक ४७ - तेजिंदर सिंह तिवाना
१९. वॉर्ड क्रमांक ५२ - प्रीती साटम
२०. वॉर्ड क्रमांक ५७ - श्रीकला पिल्ले
२१. वॉर्ड क्रमांक ५८ - संदीप पटेल
२२. वॉर्ड क्रमांक ५९ - योगिता दाभाडकर
advertisement
२३. वॉर्ड क्रमांक ६० - सयाली कुलकर्णी
२४. वॉर्ड क्रमांक ६३ - रुपेश सावरकर
२५. वॉर्ड क्रमांक ६८ - रोहन राठोड
२६. वॉर्ड क्रमांक ६९ - सुधा सिंह
२७. वॉर्ड क्रमांक ७० - अनिश मकवानी
२८. वॉर्ड क्रमांक ७२ - ममता यादव
२९. वॉर्ड क्रमांक ७४ - उज्ज्वला मोडक
३०. वॉर्ड क्रमांक ७६ - प्रकाश मुसळे
advertisement
३१. वॉर्ड क्रमांक ८४ - अंजली सामंत
३२. वॉर्ड क्रमांक ८५ - मिलिंद शिंदे
३३. वॉर्ड क्रमांक ८७ - महेश पारकर
३४. वॉर्ड क्रमांक ९७ - हेतल गाला
३५. वॉर्ड क्रमांक ९९ - जितेंद्र राऊत
३६. वॉर्ड क्रमांक १०० - स्वप्ना म्हात्रे
३७. वॉर्ड क्रमांक १०३ - हेतल गाला मार्वेकर
३८. वॉर्ड क्रमांक १०४ - प्रकाश गंगाधरे
३९. वॉर्ड क्रमांक १०५ - अनिता वैती
४०. वॉर्ड क्रमांक १०६ - प्रभाकर शिंदे
४१. वॉर्ड क्रमांक १०७ - नील सोमय्या
४२. वॉर्ड क्रमांक १०८ - दिपिका घाग
४३. वॉर्ड क्रमांक १११ - सारिका पवार
४४. वॉर्ड क्रमांक ११६ - जागृती पाटील
४५. वॉर्ड क्रमांक १२२ - चंदन शर्मा
४६. वॉर्ड क्रमांक १२६ - अर्चना भालेराव
४७. वॉर्ड क्रमांक १२७ - अलका भगत
४८. वॉर्ड क्रमांक १२९ - अश्विनी मते
४९. वॉर्ड क्रमांक १३५ - नवनाथ बन
५०. वॉर्ड क्रमांक १४४ - बबलू पांचाळ
५१. वॉर्ड क्रमांक १५२ - आशा मराठे
५२. वॉर्ड क्रमांक १५४ - महादेव शिगवण
५३. वॉर्ड क्रमांक - १७२ - राजश्री शिरोडकर
५४. वॉर्ड क्रमांक - १७४ - साक्षी कनोजिया
५५. वॉर्ड क्रमांक १८५ - रवी राजा
५६. वॉर्ड क्रमांक १९० - शितल गंभीर देसाई
५७. वॉर्ड क्रमांक १९५ - राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ)
५८. वॉर्ड क्रमांक १९६ - सोनाली सावंत
५९. वॉर्ड क्रमांक २०७ - रोहिदास लोखंडे
६०. वॉर्ड क्रमांक २१४ - अजय पाटील
६१. वॉर्ड क्रमांक २१५ - संतोष ढोले
६२. वॉर्ड क्रमांक २१८ - स्नेहल तेंडुलकर
६३. वॉर्ड क्रमांक २१९ - सन्नी सानप
६४. वॉर्ड क्रमांक २२१ - आकाश पुरोहित
६५. वॉर्ड क्रमांक २२६ - मकरंद नार्वेकर
६६. वॉर्ड क्रमांक २२७ - हर्षिता नार्वेकर
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Election : मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं जागावाटप फायनल, भाजप-शिवसेनेला किती जागा? आकडा ठरला!
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement