Weather Alert: आता दिवस पावसाचे! मुसळधार पाऊस कोसळणार, 23 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट

Last Updated:
राज्यात जोरदार पाऊस आजही पाहायला मिळाला. पाहुयात 15 जून रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल.
1/7
राज्यात जोरदार पाऊस आजही पाहायला मिळाला. 15 जूनसाठी देखील राज्यातील विविध भागांना हवामान विभागाने जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पाहुयात 15 जून रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल.

advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर कोकण किनारपट्टीतील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीला रेड अलर्ट देण्यात आला असून, पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईला पावसासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

3/7
त्याचबरोबर पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसासाठी कुठलाही अलर्ट हवामान विभागाने दिलेला नाहीये.

4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्याला तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या तीनही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर धुळे आणि नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.

5/7
 मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यांत 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

6/7
विदर्भातील ही सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम अशा सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.

7/7
राज्यामध्ये मागील 4 ते 5 दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून, अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचणे किंवा अन्य प्रकारच्या समस्या उद्भवत आहेत. तर शेतकऱ्यांना मात्र ही एक आनंदवार्ता असून, अनेक ठिकाणी खरिपाच्या पेरण्यांनी जोर घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement