Weather Alert: मोठा दिलासा! राज्यातील पावसाचा जोर ओसरणार, पंजाबराव डख यांनी दिली महत्त्वाची माहिती
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी शेतकरी बांधवांना दिलासा देणारा एक महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. सध्या राज्यात अनेक भागातील जोरदार पावसाचा जोर ओसरणारआहे.
advertisement
advertisement
advertisement
तथापि ही विश्रांती कायमस्वरूपी नसून 4 ऑक्टोबर पासून राज्यात पावसाचा दुसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. 4, 5, 6 आणि 7 ऑक्टोबर दरम्यान राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होईल. पावसाची सुरुवात 4 ऑक्टोबर रोजी विदर्भातून वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम होईल. त्यानंतर 5 ऑक्टोबरला तो मराठवाड्याकडे सरकेल आणि 5, 6, 7 ऑक्टोबर दरम्यान मुंबई, पुणे, नाशिकसह पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल.
advertisement