advertisement

'झुकती है दुनिया, बस झुकानेवाला चाहिए', अशोक खरातची सगळ्यात मोठी कबुली, महिलांना कसं भुलवायचा हेही सांगितलं

Last Updated:

भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातने अखेर तोंड उघडलं आहे. त्याने महिलांवर अत्याचार कसा केला याची कबुली दिली आहे.

अशोक खरात
अशोक खरात
भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातने अखेर तोंड उघडलं आहे. त्याने महिलांवर अत्याचार कसा केला याची कबुली दिली आहे. मात्र या अत्याचाराला त्याने विज्ञानाला जोडण्याचा प्रयत्न केला. महिलांना धमकावून आणि हातचलाखीने त्यांना आकर्षित करून शोषण केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं आहे. 'दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिए' असं देखील तो कबुली जबाबात बोलल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आपण महिलांना कसं भुलवायचो, हेही सांगितलं आहे. अशोक खरातच्या या कबुलीमुळे या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातने पोलीस कोठडीत अनेक धक्कादायक खुलासे केले. त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली असली तर त्याला याबाबत कसलाही पश्चाताप व्यक्त केला नाही. उलट, त्याने महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या 'ट्रिक्स'ला विज्ञानाचं नाव दिलं आहे. आपल्या टॅलेंटच्या जोरावर त्याने महिलांना वश केलं, असं सांगण्याचा त्याचा प्रयत्न आहे.
भोंदू खरातने पीडित महिलांना मानसिक दबावाखाली आणून त्यांच्यावर वर्चस्व निर्माण केलं. ज्या गोष्टींना लोक चमत्कार अथवा वशीकरण समजतात, तेच हातचलाखीने केल्याचं त्याने मान्य केलं. लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून आणि विज्ञानातील काही ट्रिक्स वापरून त्याने महिलांना भुलवल्याची कबुली देखील दिली आहे. त्यामुळे आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या खरातने स्वत:च कथित दैवी शक्तीमागचं थोतांड उघड केलं आहे.
advertisement
अशोक खरातने हा कबुली जबाब दिल्यानंतर त्याची विकृत मानसिकता समोर आली आहे. या घृणास्पद कृत्यात त्याला आणखी कुणाची मदत होत होती का? यात आणखी कोण कोण सहभागी आहे? या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. तपासादरम्यान, 'झुकती है दुनिया, बस झुकानेवाला चाहिए' या खरातच्या वाक्यामुळे त्याचा कोठडीत देखील माज कायम असल्याचं दिसून येत आहे. आज एसआयटीमार्फत पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासे होण्याची शक्यता आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
'झुकती है दुनिया, बस झुकानेवाला चाहिए', अशोक खरातची सगळ्यात मोठी कबुली, महिलांना कसं भुलवायचा हेही सांगितलं
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement