डेस्टिनेशन वेडिंग करायचंय? 'या' मंदिरात बांधा लग्नगाठ, आयुष्यभर राहाल सुखात! विदेशातून येतात कपल्स
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
सध्या डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड आहे. तुम्हालासुद्धा हा ट्रेंड फॉलो करायचा असेल आणि तुम्ही धार्मिकही असाल, तर देवभूमी मानल्या जाणाऱ्या उत्तराखंडमधील पवित्र मंदिरांमध्ये आपण लग्न करू शकता. उत्तराखंड हे नैसर्गिक सौंदर्याने संपन्न ठिकाण आहे. इथे देवाच्या साक्षीने आपल्या जोडीदाराशी जन्मोजन्मीची गाठ बांधणं म्हणजे तो अनुभव स्वतः देवतांच्या उपस्थित लग्न करण्यासारखा असेल, असं म्हणायला हरकत नाही.
चामोली जिल्ह्यातील कर्णप्रयागमध्ये अलकनंदा आणि पिंडर नदीकिनारी उमा देवीचं मंदिर आहे. 8व्या शतकात शंकराचार्यांनी या मंदिराची स्थापना केली होती, अशी मान्यता आहे. उमा देवीला पार्वती देवीचं रूप मानलं जातं. असं म्हणतात की, पार्वती देवीने महादेव आपले पती व्हावे यासाठी अपर्णा रूप धारण करून निर्जळी व्रत धरून इथेच ध्यानधारणा केली होती. त्यामुळे या मंदिरात लग्न करणं अत्यंत पवित्र मानलं जातं.
advertisement
रुद्रप्रयागपासून जवळपास 70 किलोमीटर अंतरावर असलेलं हे त्रियुगीनारायण मंदिर भगवान विष्णूंना समर्पित आहे. असं म्हणतात की, विष्णूंच्या उपस्थितीत याच ठिकाणी महादेव आणि पार्वती देवीचा विवाह संपन्न झाला होता. भगवान विष्णू यांनी त्यावेळी पार्वती देवीच्या भावाचं कर्तव्य पार पाडलं होतं. आज देश-विदेशातून भाविक या मंदिरात लग्न करण्यासाठी येतात.
advertisement
हरिद्वारच्या विल्व पर्वतावर बिल्वकेश्वर हे महादेवांचं प्राचीन मंदिर आहे. असं म्हणतात की, गौरी देवीने जवळपास तीन हजार वर्ष महादेवांसाठी याठिकाणी ध्यानधारणा केली होती. जेव्हा महादेव आलेच नाहीत तेव्हा त्यांनी केवळ बेलपत्र आणि पाणी ग्रहण करून एक हजार वर्ष ध्यानधारणा केली. त्यानंतर महादेव प्रसन्न झाले. इथे असलेल्या गौरीकुंडाची स्थापना गौरीने आपल्या हातातल्या कड्यांनी केली होती असं म्हटलं जातं.
advertisement
advertisement