नवरात्रीतील अद्भुत सोहळा! भुईंजच्या महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर सूर्याकिरणांचा अभिषेक, पाहा PHOTOS

Last Updated:
साताऱ्यातील भुईंज येथील प्राचीन महालक्ष्मी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला एक अद्भुत सोहळा घडला. दरवर्षी परंपरेनुसार, पावसाने विश्रांती घेतल्यानंतर...
1/7
 सातारा : भुईंज येथील प्राचीन महालक्ष्मी देवीच्या मंदिरात सध्या नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. या मंदिरात गुरुवारी सकाळी सहा वाजता एक अद्भुत सोहळा घडला, जेव्हा सूर्यकिरणांनी देवी महालक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक केला. हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविकांनी महालक्ष्मीचा जयघोष केला. (Photo credit : Kunal Jadhav, Bhuinj)

advertisement
2/7
 कृष्णा नदीच्या घाटावर असलेले हे मंदिर आपल्या वेगळ्या स्थापत्यकलेसाठी ओळखले जाते. सध्या नवरात्रोत्सवामुळे मंदिरात उत्साहाचे वातावरण आहे, त्यातच पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गुरुवारी सकाळी हा किरणोत्सव घडल्यामुळे सर्वत्र चैतन्य निर्माण झाले आहे. (Photo credit : Kunal Jadhav, Bhuinj)

3/7
 भुईंज येथील महालक्ष्मी देवीच्या मंदिरात नवरात्रीच्या दर्शनासाठी दररोज भाविकांची गर्दी वाढत आहे. गुरुवारपासून सुरू झालेला हा सूर्यकिरणांचा अभिषेक सोहळा सर्वांसाठीच एक पर्वणी ठरत आहे.  (Photo credit : Kunal Jadhav, Bhuinj)

4/7
 दरवर्षी परंपरेनुसार, नवरात्रीत पाऊस नसेल तर चौथ्या माळेला सूर्यकिरण महालक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक घालतात. हा सोहळा पाहण्यासाठी दूरवरून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

5/7
 मागील मे महिन्यापासून सर्वत्र पावसाळा आहे. त्यामुळे सूर्यप्रकाश जवळपास नसल्याने यंदा हा किरणोत्सव घडणार का, याबद्दल सर्वांनाच कुतूहल होते, तरीही गुरुवारी सकाळी भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने मंदिरात उपस्थित होते.

6/7
 सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण येण्यास सुरुवात झाली आणि बघता बघता पायापासून देवीच्या कपाळापर्यंत देवी सूर्यकिरणांनी न्हाऊन निघाली. या सोहळ्यानंतर भाविकांनी एकच जल्लोष केला.

7/7
 या वेळी देवीची आरती करण्यात आली. नवरात्र उत्सवाच्या चौथ्या माळेत देवीच्या कपाळाला जेव्हा या सूर्यकिरणांनी स्पर्श केला, तेव्हा चैतन्य आणि श्रद्धेचा संगम अनुभवण्यास मिळाला.

OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement