यामुळे होतो इन्व्हर्टरच्या बॅटरीचा स्फोट, overheat पासून नेमका कसा बचाव कराल, महत्त्वाचा सल्ला
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
इलेक्ट्रॉनिक वस्तू आता मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग झाल्या आहेत. यामध्ये इन्व्हर्टर बॅटरी एक महत्त्वाची वस्तू आहे. यामुळे काही ठिकाणी मोठे अपघातही होतात. पण इन्व्हर्टरची बॅटरी फुटण्याची नेमकी कारणे कोणती आहेत, हे अनेकांना माहिती नसते. तसेच ही बॅटरी कशी सुरक्षित ठेवावी, हे जाणून घेऊयात. (आकाश निशाद, प्रतिनिधी)
इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहेत. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे इन्व्हर्टर बॅटरी. त्यामुळे अनेक अपघातही घडतात. सर्वाधिक अपघात हे उन्हाळ्यात होतात. याबाबत इलेक्ट्रॉनिक तज्ञ शुभम यादव यांनी माहिती दिली. त्यांनी इन्व्हर्टरची बॅटरी फुटण्याची कारणे काय आहेत आणि ती कोणत्या प्रकारे सुरक्षित ठेवता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
इन्व्हर्टरचा बॅटरी बॅकअप कमी देत आहे की नाही किंवा बॅटरी डेड झाली आहे की नाही हे शोधण्यासाठी त्यांनी सांगितले की, बॅटरीच्या वरच्या भागावर 6 सेल असतात. चार्जिंग करताना, बॅटरीचे झाकण उघडा आणि बॅटरीमधील पाणी बुडबुडे किंवा उकळत आहे का, ते पहा. जर ते उकळल्यासारखे वाटत असेल तर तुमची बॅटरी सुरक्षित आहे, अन्यथा सेल डेड झाले आहेत, असे समजावे, असेही त्यांनी सांगितले.