iPhone 17 वर तब्बल ₹8000चं डिस्काउंट! सोडू नका संधी, पाहा कुठेय ऑफर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
फ्लिपकार्ट Republic Day Sale मध्ये iPhone 17 ची किंमत कमी होऊन 74,900 रुपयांपर्यंत येऊ शकते. जाणून घेऊया iPhone 17 चे फीचर्स, कॅमेरा, परफॉर्मेंस आणि बरंच काही.
तुम्हाला आयफोन खरेदी करण्याची खुप इच्छा असेल तर फ्लिपकार्टवरील ऑफरचा फायदा तुम्ही घेऊ शकता. भारतात iPhone 17 खरेदीची ही उत्तम संधी आहे. कारण लेटेस्ट मॉडलवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. रिपब्लिक डे सेल 17 जानेवारीपासून सुरु होणार आहे आणि यापूर्वी वृत्त आहे की, iPhone 17 (256GB) ची किंमत कमी होऊन जवलपास 74,900 रुपयांपर्यंत येऊ शकते.
advertisement
advertisement
advertisement
परफॉर्मेंसविषयी बोलायचे झाल्यास, iPhone 17 मध्ये अॅपलची नवीन A19 चिप आहे. हा फोन सोशल मीडिया ब्राउझ करणे, व्हिडिओ पाहणे, गेम खेळणे किंवा अनेक अॅप्स वापरणे यासारखी दैनंदिन कामे कोणत्याही विलंबाशिवाय हाताळतो. अॅपल फोन दीर्घकालीन अपडेट्स मिळवतात, त्यामुळे ही उपकरणे येत्या काही वर्षांत स्मूद चालत राहतील.
advertisement
advertisement
कॅमेरा आणि बॅटरी देखील खास : कॅमेरा हा iPhone 17 चा एक प्रमुख आकर्षण आहे. यात दोन 48MP रिअर कॅमेरे आहेत. जे चांगले डिटेल्ड फोटो आणि स्थिर व्हिडिओ कॅप्चर करतात. कॅमेरा कमी प्रकाशातही चांगले काम करतो. 4K Dolby Vision आणि सिनेमॅटिक व्हिडिओ सारखी फीचर्स व्हिडिओ निर्मात्यांना नक्कीच आवडतील. फ्रंट कॅमेरा व्हिडिओ कॉल आणि रील्ससाठी देखील विश्वासार्ह आहे.
advertisement
advertisement









