advertisement

खरातचे Video कुणी दिले? त्याला कसं पकडलं? प्रॉपर्टी कुठे कुठे? फडणवीसांनी कॅप्टनचा कच्चाचिठ्ठा काढला!

Last Updated:

Devendra Fadanvis on Ashok Kharat: देशभरात चर्चिल्या जाणाऱ्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी विधानसभेत निवेदन केले. अशोख खरात याची अटक ते विशेष पोलीस पथकाकडून त्याची सुरू असलेली चौकशी याविषयी त्यांनी निवेदनातून राज्याला माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
मुंबई : चार पीडित महिलांनी भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरुद्ध विविध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी नोंदवल्या आहेत. अशोक खरात याची विशेष पोलीस पथकाकडून चौकशी सुरू आहे. चौकशीत त्याने अनेक महिलांवर शारीरिक अत्याचार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. महिला भक्तांच्या धार्मिक श्रद्धेशी आणि भावनांशी खेळून त्याने महिलांवर अत्याचार केले. सुरुवातीला त्याच्याविरोधात तक्रार करायला महिला पुढे येत नव्हत्या. मात्र त्यानंतर पोलिसांनी समुपदेशन करून आणि तक्रारदारांना ओळख उघड न होण्याचे आश्वस्त करून तक्रारी देण्यास सांगितले. आतापर्यंत खरातविरोधात सहा तक्रारी आल्या असून पोलीस चौकशी सुरू आहे. त्याने आतापर्यंत अनेक देशांत भ्रंमती केली असून त्याची अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत अनेक ठिकाणी संपत्ती आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच त्याच्या मालमत्तांची चौकशी सुरू असल्याचे सांगून त्याने करचुकवेगिरी केली आहे का, हे देखील तपासत असल्याचे फडणवीस म्हणाले.
नाशिक पोलिसांनी अतिशय गुप्तपणे आणि चाणाक्षपणे अशोक खरात याच्यावर बुधवारी रात्री अटकेची कारवाई केली. पोलीस महासंचालकांच्या निर्देशानंतर संवेदनशील आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष पोलीस पथक खरातची चौकशी करीत आहे. खरातने लोकांना कसे गंडवले, महिलांना कसे जाळ्यात ओढले, राजकारणी आणि खरातचे संबंध कसे होते? याविषयी महाराष्ट्राला प्रश्न आहेत. याच प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदनातून दिली.
advertisement

ते व्हिडीओ पोलिसांना कुणी दिले?

खरात याच्या कार्यालयात काम करणाऱ्या नीरज जाधव याने पोलिसांना संबंधित व्हिडीओ दिल्याचे आतापर्यंत मानले जात होते. मात्र योगेश भालेराव या व्यक्तीने आठ महिलांचे ३५ व्हिडिओ
दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. साक्षीदार योगेश भालेराव पोलीस संरक्षण देणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

खरातने एका महिलेला गरोदर ठेवलं, गोळ्यांनी गर्भही पाडला

advertisement
फडणवीस म्हणाले, फेब्रु २०२० ते १८ मार्च २०२६ या काळात ओकस प्रॉपर्टिज कॅनडा चौक नाशिक येथे फिर्यादीस बोलावून एकांतात कार्यालयात असताना तिला तांब्याच्या बाटलीतील मंतरलेले पाणी देऊन विधीच्या नावाखाली वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध केले. यातून फिर्यादीस दिवस गेल्याने अशोक खरात याने गोळ्या खायला देऊन गर्भपात घडवून आणला. तसेच विधीला नकार दिला तर भविष्यात तुझे चांगले होण्याऐवजी वाटोळे होईल, तुझ्या मुलांचे बरेवाईट होईल, असा दम दिला. पीडिल महिलेला दिव्य जडीबुटीचे औषध आहे असे सांगून द्रव्य दिले होते. हे द्रव्य तपास कामाकरिता फॉरेन्सिकला पाठविण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
advertisement

कॅप्टन खरातची संपत्ती कुठे कुठे?

अशोक खरात याची मिरगावात ३३ एकर जमीन असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच नाशिक, पाथर्डी, अहिल्यानगर, शिर्डी, मिरगाव आदी भागांत अशोक खरात याच्या संपत्ती असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कॅप्टन खरातला अटक कसे केले?

नाशिक पोलिसांनी कौशल्य पणाला लावून रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी अशोक खरात याला अटक केले. घराच्या आसपास चोरी झाल्याचे सांगून त्याला घराबाहेर पडण्यास भाग पाडले आणि नंतर त्याला ताब्यात घेतल्याचे सांगितले. अटक कारवाईची कुणकुण अशोक खरात याला लागली असती तर परदेशात पळून गेला असता. ही शक्यता दाट होती, त्यामुळे आम्ही आधीच त्यासंबंधीची खरबरदारी घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खरातचे Video कुणी दिले? त्याला कसं पकडलं? प्रॉपर्टी कुठे कुठे? फडणवीसांनी कॅप्टनचा कच्चाचिठ्ठा काढला!
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement