गरोदर महिलांचं पोट फाडून बाळाला ठार मारत होते जवान, जगातील 5 डोकं थिजवणाऱ्या घटना
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
holocost Genocide: संयुक्त राष्ट्रांनी नरसंहार या शब्दाची व्याख्या केली आहे. त्यानुसार, जेव्हा एखाद्या देशातील राष्ट्रीय, जातीय, वांशिक किंवा धार्मिक समूहाचा नाश करण्याच्या उद्देशाने हत्या केल्या जातात तेव्हा त्याला नरसंहार असं म्हटलं जातं.
संयुक्त राष्ट्रांनी नरसंहार या शब्दाची व्याख्या केली आहे. त्यानुसार, जेव्हा एखाद्या देशातील राष्ट्रीय, जातीय, वांशिक किंवा धार्मिक समूहाचा नाश करण्याच्या उद्देशाने हत्या केल्या जातात तेव्हा त्याला नरसंहार असं म्हटलं जातं. 1943 मध्ये ज्यू-पोलिश वकील राफेल लेमकिनने नरसंहार हा शब्द तयार केला. त्याने `जेनोस` (वंश किंवा जमात) या ग्रीक शब्दाला `सेड` (मारणे) हा शब्द जोडला. जगातील पाच अशा भीषण हत्याकांडांबद्दल सविस्तर माहिती...
advertisement
1939 मध्ये जर्मनीने पहिले महायुद्ध भडकवल्यानंतर, हिटलरने ज्यूंचा समूळ नायनाट करण्याकरिता अंतिम उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली. 1941 पासून हिटलरची गुप्तचर संस्था एस एस युरोपातील बहुतांश देशांमधून ज्यूंना पकडून ऑशविट्झच्या नाझी होलोकॉस्ट सेंटरमध्ये आणत असे. याठिकाणी काम करणाऱ्या लोकांना जिवंत ठेवलं जात असे, तर वृद्ध किंवा अपंग व्यक्तींना गॅस चेंबरमध्ये टाकून मारले जात होते, असं सांगितलं जातं. बऱ्याच अहवालांमधील दाव्यानुसार, होलोकॉस्टमध्ये सुमारे 60 लाख ज्यूंची हत्या करण्यात आली होते. हे त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश होते.
advertisement
दक्षिण अमेरिकी देश असलेल्या कंबोडियात 1970 च्या दशकात कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस पोल पॉट यांच्या नेतृत्वात ख्मेर रूज्या राजवटीत लोकांवर भयानक अत्याचार झाले. या घटनेने संपूर्ण कंबोडियाला साम्यवादाकडे ढकलले. परिणामी 1975 ते 1979 दरम्यान सुमारे 20 लाख लोकांचा मृत्यू झाला. ही संख्या त्यावेळच्या कंबोडियाच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश होती.
advertisement
1864 मध्ये रशियाने सर्कशियन्सवर कब्जा केला तेव्हा सर्केशियन नरसंहार केला गेला. केवळ तीन वर्षात रशियन सैन्याच्या अत्याचारामुळे 90 टक्के सर्केसियन लोक एकतर सैन्याकडून मारले गेले किंवा ते पळून गेले. रशियन सैनिक मनोरंजनासाठी सर्केशियन गर्भवती महिलांचे पोट फाडून बाळ बाहेर काढायचे. इतकंच नाही तर नंतर ते अल्प विकसित भ्रूणाला कुत्र्यासमोर फेकून देत. रशियन जनर ग्रिगोरी झास इथल्या स्त्रियांना अमानुष आणि घाण समजायचा.
advertisement
आर्मेनियन आणि अन्य इतिहासकारांच्या मते, 1915 मध्ये ऑटोमन सैन्याने पद्धतशीरपणे सुमारे 15 लाख लोकांची हत्या केली होती. तुर्कीने हा दावा सातत्याने फेटाळला आहे. त्यामुळे आर्मेनिया आणि तुर्कीतील संबंधामध्ये तणार राहिला आहे. दुसऱ्या महायुद्धावेळी लाखो ज्यूंची झालेली हत्या आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची जेवढी चर्चा झाली, तेवढी चर्चा पहिल्या महायुद्धादरम्यान मारल्या गेलेल्या आर्मेनियन नागरिकांबद्दल झालेली नाही.
advertisement
एका अंदाजानुसार, बोस्नियाच्या सर्ब सैनिकांनी एका हत्याकांडात 8 हजार मुस्लिमांची हत्या केली होती. मृत व्यक्तींपैकी बहुतेकांचे वय 12 ते 77 वर्षादरम्यान होते. हा नरसंहार इतका भीषण होता की बहुतांश लोकांना पॉईंट ब्लँक रेंजवर (कपाळाच्या मध्यभागी) गोळ्या घालण्यात आल्या. या नरसंहारानंतर बोस्नियाचे माजी सर्ब कमांडर जनरल रत्को म्लाडिक हे बोस्नियाचे बुचर म्हणून ओळखले जाऊ लागले.